Supreme Court | पत्नीला घटस्फोट देऊ शकता, मुलांना नाही; 4 कोटी जमा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Supreme Court | सुप्रीम कोर्टाने मंगळवारी एका महत्वाच्या निर्णयात एका व्यक्तीला आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याची सूट दिली, परंतु सोबतच म्हटले की, मुलांसोबत घटस्फोट होऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हिरे आणि दागिन्याच्या व्यापाराशी संबंधीत मुंबईतील एका व्यक्तीला 4 कोटी रुपयांची तडजोड रक्कम जमा करण्यासाठी सहा आठवड्यांचा वेळ दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सोबतच संविधानाच्या कलम 142 च्या अंतर्गत मिळालेल्या समग्र अधिकारांचा वापर करत 2019 पासून वेगळे राहत असलेल्या दाम्पत्याच्या आपसातील सहमतीच्या घटस्फोटावर सुद्धा शिक्कामोर्तब केले.

यापूर्वी जस्टिस डी. वाय. चंद्रचूड आणि जस्टिस एमआर शाह यांच्या पीठाकडून सुनावणी दरम्यान पतीच्या वकिलाने कोरोना महामारीने व्यापारात नुकसान झाल्याचा संदर्भ देत तडजोड रक्कम देण्यासाठी आणखी वेळ मागितला.

परंतु पीठाने म्हटले, तुम्ही स्वतः तडजोडीमध्ये सहमती दिली आहे की घटस्फोटाच्या डिक्रीच्या दिवशी तुम्ही 4 कोटी रुपये भरणार आहात.
आता हे आर्थिक अडचणीचे कारण सांगणे योग्य ठरणार नाही.
तडजोड 2019 मध्ये झाली होती आणि त्यावेळी महामारी नव्हती.

पीठाने म्हटले, तुम्ही तुमच्या पत्नीला घटस्फोट देऊ शकता.
परंतु तुम्ही मुलांपासून घटस्फोट घेऊ शकत नाही, कारण तुम्ही त्यांना जन्म दिला आहे. तुम्हाला त्यांची देखभाल करावी लागेल.
तुम्हाला तुमच्या पत्नीला तडजोड रक्कम द्यावीच लागेल जेणेकरून ती स्वतःचे आणि अल्पवयीन मुलांचे पालनपोषण करू शकते.

यासोबतच पीठाने पतीला आगामी एक सप्टेंबरपर्यंत एक कोटी रुपये देणे आणि उर्वरित 3 कोटी रुपये सुद्धा आगामी 30 सप्टेंबरपूर्वी देण्याचे आदेश दिले.
दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, आणि त्यांच्या ताब्याबाबत अगोदरच दोघांमध्ये सहमती झाली होती.

Join our WhatsApp GroupTelegram, Instagram ,facebook page and Twitter for every update

Web Titel :  supreme court says husband can divorce wife not children

हे देखील वाचा

LPG Gas Cylinder Price | घरगुती सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ; 25 रुपये द्यावे लागणार जादा

Pune Crime | पुण्याच्या बोपदेव घाटात प्रेमी युगुलाला लुबाडले; तरुणीवर चाकूने वार करुन केले जखमी

Weather Updates | महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि MP सह देशाच्या ‘या’ भागांमध्ये कोसळणार जोरदार पाऊस, जाणून घ्या IMD चा ताजा अंदाज

Sunanda Pushkar Death Case | सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता