Supriya Sule On Ajit Pawar | ‘ईव्हीएम’चं बटन कचाकचा दाबा, अजितदादांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी… (Videos)

पुणे : Supriya Sule On Ajit Pawar | व्यापाऱ्यांच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते की आम्ही तुम्हाला निधी देतोय, तुम्ही पण ईव्हीएमचं बटन आमच्यासाठी कचाकचा दाबा. या वक्तव्यावरून राज्यात मोठा वादंग निर्माण झाला आहे. विरोधकांनी अजित पवारांना यावरून घेरले आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनीही सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. (Baramati Lok Sabha)

अजितदादांच्या या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता बारामती मतदार संघातील शरदचंद्र पवार पक्षाच्या (Sharad Pawar NCP) उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी एका वाक्यात उत्तर दिले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी. (Supriya Sule On Ajit Pawar)

आज सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघातील पुण्यात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज सुप्रिया सुळे या ज्येष्ठ नेते शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. यानंतर पुण्यातच मविआची पहिलीच जाहीर प्रचारसभा होणार आहे, या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjog Waghere On Shrirang Barne | संजोग वाघेरेंनी सोडले बारणेंवर टीकास्त्र, ”दहा वर्षात
एकही प्रकल्प नाही, कामगार, पर्यटन, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले…”

Murlidhar Mohol Meet Amit Raj Thackeray | पुण्यात मनसे नेते अमित ठाकरेंच्या भेटीनंतर
मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘आत्मविश्वास आणखी वाढला, विजय अधिक सोप्पा झाला’ (Videos)

Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; भांडण सोडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली