Supriya Sule On Ajit Pawar | सुप्रिया सुळेंची अजितदादांवर चौफेर टोलेबाजी, ”जो तुम्हाला धमक्या देतो आहे ना त्याला फक्त माझा नंबर द्या, कारण…” (Video)

पुणे : Supriya Sule On Ajit Pawar | लोकं दबक्या आवाजात फोन करतात आणि मला सांगतात मला धमकीचे फोन आले होते. पण सगळ्यांना मी सांगते, जो तुम्हाला धमक्या देतो आहे ना त्याला फक्त माझा नंबर द्या. कारण ते ज्यांना दिल्लीत घाबरतात त्यांच्यासमोरच मी आणि अमोल कोल्हे भाषण करतो आणि अगदी निडरपणे भाषण करतो, असे म्हणत बारामतीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खरपुस समाचार घेतला. (Baramati Lok Sabha)

आज पुणे येथे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बारामतीच्या (Baramati Lok Sabha) उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूरचे (Shirur Lok Sabha) उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले. यानंतर मविआची पहिलीच मोठी जाहीर प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्यावर आणि अमोल कोल्हेंवर बरीच टीका करतात. मला गंमत वाटते हे सगळे पाहून. कारण १५ ते १८ वर्षे आम्ही सगळे बरोबर काम करत होतो आणि घटस्फोट होऊन सहाच महिने झालेत. आमच्या विरोधात १८ वर्षांत विरोधात न बोलणारे आज वैयक्तिक टीका करत आहेत. मी आणि अमोलदादा कुणावरही अशी टीका करत नाही. ही निवडणूक आता महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने हातात घेतली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला माहीत आहे उन्हाळा वाढला आहे. त्यामुळे बर्फ लागतो आहे म्हणजेच आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. आपण रिकाम्या हातानेच जाणार आहोत. आम्हाला काही घाबरायची भीती नाही. वैयक्तिक टीका काही झाले तरीही करणार नाही.

अजित पवारांना इशारा देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, इतके दिवस मोठ्यांचा मान म्हणून ग्रामपंचायत,
कारखाना, जिल्हा परिषद, दूधसंघ यामध्ये लक्ष घातले नाही.
घरातला मोठा माणूस ते करतोय तर त्याला मदत करावी असे संस्कार माझ्यावर आहेत.
पण आता सांगते की लोकसभा झाल्यानंतर विधानसभा, त्यानंतर ग्रामपंचायत, कारखाना,
सोसायटी, कॉर्पोरेशन ज्या निवडणुका होतील त्यात महाविकास आघाडी ताकदीने लढणार आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्यावरही अमोल कोल्हेंसारखीच टीका केली जाते की मी दहा वर्षांत केंद्रातला कुठलाच निधी आणला नाही.
मी विनम्रपणे त्यांना सांगू इच्छिते की माझा मराठीतील कार्य अहवाल वाचला नसेल.
तो मी सगळ्यांना पाठवणार आहे. माझा कार्य अहवाल जर वाचला तर सर्व टीका करणारे मलाच मतदान करतील.
आम्ही त्यांच्यावर खालच्या पातळीला जाऊन भाषण करणार नाही. माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur Lok Sabha | अमोल कोल्हे यांनी शिरूरसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, जोरदार शक्तीप्रदर्शन (Video)

Baramati Lok Sahba | सुप्रिया सुळे यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला (Videos)

Ajit Pawar NCP MLA | अजित पवारांच्या आमदाराचे खळबळजनक वक्तव्य, सहा महिन्यानंतर महायुती तुटणार? बारणेंच्या अडचणी देखील वाढू शकतात