‘नागपूरचे आहात तर नागपूरचेच रहा, आमच्याशी पंगा घेऊ नका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तुमचं नागपूरचं बंडल तिथेच ठेवा, असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. दौंड, बारामती, इंदापूर हे माझं कुटुंब आहे असे म्हणत आमच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे. नागपूरचे आहात तर नागपूरचेच रहा, आमच्याशी पंगा घेऊ नका. असेही त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “दौंड, बारामती, इंदापूर हे माझं कुटुंब आहे. माझी जी काही ओळख आहे ती या मतदारसंघामुळे आणि तिथून आम्हाला निवडून देणाऱ्या लोकांमुळे आहे. त्यामुळे तुम्ही तिथे येऊन आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका.

‘नागपूरचे आहात तर नागपूरचेच रहा, आमच्याशी पंगा घेऊ नका’

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “तुम्ही आमच्या घरात येऊन भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका, काहीही गडबड करण्याचा प्रयत्न केलात तर गाठ माझ्याशी आहे हे विसरू नका. बाहेरून लोक येतात आणि बारामती दौंडच्या अंतराबद्दल बोलतात. नागपूरचे आहात तर नागपूरचेच रहा, आमच्याशी पंगा घेऊ नका.” असा इशाराही त्यांनी दिला. याशिवाय, “दौंड, बारामती, इंदापूर, खडकवासला, पुरंदर हा जिल्हा माझा आहे. गेली सहा वर्षे जी काय माझी ओळख आहे ती यामुळेच आहे. इथल्या लोकांमुळेच आहे. जर आमच्या घरात लुडबूड करण्याचा प्रयत्न केलात तर याद राखा, मी काही तुम्हाला ऐकणार नाही.” असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.