Supriya Sule | ‘…म्हणून मी गृहमंत्री अमित शहांकडे न्याय मागणार आहे’ – सुप्रिया सुळे

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Supriya Sule | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना ईडीने मनी लाँन्ड्रिंग प्रकरणावरून अटक केली आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीने भाजपवर जोरदार टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपण गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेत त्यांच्याकडेच न्याय मागणार असल्याचं म्हटलं आहे. मुंबईतील धरणे आंदोलनात त्या बोलत होत्या.

 

कोणताही व्यक्ती एकदा मंत्री झाला की तो पक्षाचा न राहता देशाचा मंत्री होतो. अमित शहा हे देशाचे मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे एक महिला म्हणून मी न्याय मागणार आहे. त्यासोबतच ईडीच्या (ED) बातम्या भाजपच्या नेत्यांना कशा मिळतात याची चौकशी व्हावी, अशी मागणीही गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

ईडीची कुठलीही कारवाई (Action) होते तेव्हा महिन्याअगोदरच त्या कारवाईसंबंधीच्या बातम्या बाहेर कशा येतात?, दहावीचा एखादा पेपर फुटला की परीक्षा (Exam) रद्द होते. शिक्षण अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात. मग ईडी कारवाईच्या बातम्या बाहेर येतात तेव्हा ईडीचा पेपर फुटल्याची जबाबदारी कोण घेणार?, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

 

दरम्यान, विरोधी पक्षातील काही लोक बिनबुडाचे आरोप (Allegations) करत आहेत, हे दुर्दैवी आहे.
भाजपची (BJP) पोलखोल बऱ्याच काळापासून नवाब मलिक (Nawab Malik) करत आले आहेत.
त्यामुळे त्यांना सतत धमक्या मिळत होत्या. जेव्हा नवाब मलिक धमक्यांना जुमानत नाहीत असे
दिसायला लागले तेव्हा त्यांच्यावर खोट्या आरोपांची राळ उठवण्यात आल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Supriya Sule | ‘… so I will seek justice from Home Minister Amit Shah’ – Supriya Sule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 60 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 25 हजार रोख आणि पोलीस चौकीसाठी प्रिंटरची लाच मागणाऱ्या 2 पोलिसांवर FIR; पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ

 

Urfi Javed Hot Viral Video | सेक्सी बिकिनी घालून स्विमिंग पूल मधून बाहेर आली उर्फी जावेद, कॅमेरा पाहताच सुरू केला डान्स..!

 

Safe Investment Planning | ‘या’ स्कीममध्ये लावा केवळ 10,000 रुपये, मॅच्युरिटीनंतर होईल 16 लाखांचा फायदा, जाणून घ्या कसा?