Survey | 60% कर्मचार्‍यांना वाटते पगार थोडा कमी मिळाला तरी चालेल पण काम करण्याचे स्वातंत्र्य असावे : सर्वे

नवी दिल्ली : Survey | कोरोना महामारीने वर्क फ्रॉम होमचे नवीन कल्चर सुरू केले आहे. कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेनंतर कंपन्यांपासून कर्मचार्‍यांपर्यंत आता या नवीन ट्रेंडला आपले रूटीन लाईफ बनवण्याचा विचार करू लागले आहेत. अनेक कर्मचारी आहेत ज्यांना फुल टाइम ऑफिसमध्ये काम करायचे नाही, मग यासाठी त्यांना पगाराशी तडजोड करावी लागली तरी चालेल (Survey).

Pune City News | शस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींना जामीन, पुणे गुन्हे शाखेने केली होती अटक

एका सर्वेत समोर आले आहे की, देशातील 60 टक्के कर्मचारी कमी सॅलरीत सुद्धा जॉब स्विच करण्यास तयार आहेत, केवळ अट ही आहे की त्यांना कुठूनही काम करण्याची सूट मिळाली पाहिजे म्हणजे त्यांना वाटले तर घरातून काम करू शकतात किंवा ऑफिसमधून.

survey | about 60 professionals willing to switch jobs for work flexibility survey

को-वर्किंग ऑपरेटर Awfis कडून करण्यात आलेल्या या सर्वेतून समोर आले आहे की, कोविड-19 महामारीच्या दुसर्‍या लाटेच्या दरम्यान भारताच्या वर्क इकोसिस्टममध्ये आणखी कोणते बदल झाले आहेत. हा सर्वे 1000 भारतीय वर्किंग प्रोफेनल्ससोबत करण्यात आला, ज्यामध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आणि वेगवेगळया जॉब रोल्सच्या प्रोफेशनल्सचा समावेश होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हा सर्वे मे आणि जून 2021 च्या दरम्यान करण्यात आला ज्यामध्ये देशातील सात मेट्रो शहरातील प्रोफेशनल्सने सहभाग घेतला.

Sachin Waze । 100 कोटी वसुली प्रकरणात ईडीपाठोपाठ आता सीबीआय पुन्हा ‘अ‍ॅक्टिव’ होणार

Awfis च्या सर्वेतील महत्वाचे मुद्दे
– 71 टक्केने मान्य केले ऑफिसमध्ये असते सहजता.
– या सर्वेत 71 टक्केंनी मान्य केले ऑफिसमध्ये टीम मॅनेज करणे सोपे जाते.
– 72 टक्केंना वाटते फिजिकल वर्कस्पेसमध्ये नेटवर्किंगने ते समाधानी आहेत.
– 74 टक्केंनी मान्य केले, ते करियरच्या ग्रोथबाबत असामाधानी आहेत. काहींना वाटते ग्रोथ घसरत आहे.
– 57 टक्क्यांचे म्हणणे आहे पार्ट-रिमोट वर्कसाठी जास्त सॅलरी घेऊ किंवा नोकरी सोडून अशा दुसर्‍या ठिकाणी जॉब करू जिथे जास्त लवचिक पर्याय असतील.

Pune Police News | ‘कोरोना’ संकटकाळातील पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय – उपमुख्यमंत्री अजित पवार
– 72 टक्केंचे म्हणणे आहे की, त्यांना हायब्रिड वर्क मॉडल पसंत आहे, ज्यात ते घर आणि ऑफिस दोन्हीकडून काम करू शकतात.
– 58 टक्के प्रोफेशनल्सने इच्छा व्यक्त केली की त्यांना जवळच्या ब्रँच ऑफिसमध्ये काम करायचे आहे किंवा कंपनीकडून को-वर्किंग स्पेस दिली गेली तर तिथे काम करणे पसंत करू.
– 82 टक्के लोकांनी म्हटले जेव्हा ते व्हॅक्सीन घेतील तेव्हा ऑफिसात परतण्यास काहीही अडचण नाही, केवळ थोडी फ्लेक्सिबिलिटी मिळावी.
– Awfis ची 75 सेंटर्स आहेत, जी 11 शहरात पसरलेली आहेत आणि एकुण 40,000 सीट आहेत.


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : survey | about 60 professionals willing to switch jobs for work flexibility survey

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update