रियाचे कॉल डिटेल आले समोर, सुशांतच्या मृत्यूनंतर ‘त्या’ DCP शी 4 वेळा झाले बोलणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अ‍ॅक्टर सुशांत सिंह राजपूत केसचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत, यामुळे केवळ रिया चक्रवर्तीच नव्हे, तर अनेकजण अडचणीत येण्याची शक्यता आहे. आता रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्समधून आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. असे म्हटले जात आहे की, सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती सतत ब्रांदा डीसीपी यांच्या संपर्कात होती आणि तिने अनेकदा डीसीपींना फोनसुद्धा केला होता.

सुशांतच्या मृत्यूनंतर ब्रांदा डीसीपींशी चर्चा
कॉल डिटेल्सवरून समोर आले आहे की, रिया चक्रवर्ती आणि बांद्रा डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्यामध्ये चारवेळा फोनपर चर्चा झाली आहे. आणखी एका मॅसेजद्वारे सुद्धा संपर्क साधला गेला आहे. जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार रियाने 21 जूनला ब्रांदा डीसीपींशी फोनवर 28 सेकंद चर्चा केली होती.

22 जूनला डीसीपींनी रियासाठी मॅसेज सोडला होता. यानंतर डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांनी 22 तारखेलाच रियाशी फोनवर 29 सेकंद चर्चा केली. 8 दिवसानंतर पुन्हा डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्याकडून रिया चक्रवर्तीला फोन लावण्यात आला. तेव्हा 66 सेकंद दोघांचे बोलणे झाले. यानंतर काही दिवसांपर्यंत दोघांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही, परंतु 18 जुलैला पुन्हा रियाकडून डीसीपींना फोन लावण्यात आला.

मुंबई पोलिसांनी दिले स्पष्टीकरण
या फोन कॉल्सवर मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे की, हे कॉल रियाला जेव्हा बांद्रा पोलीस स्टेशन आणि सांताक्रूज पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले तेव्हाचे आहेत. रियाला स्टेटमेंट नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले होते. हे फोन कॉल ऑफिशियल कारणांसाठी केले गेले आहेत.

रिया आणि डीसीपी यांच्यामध्ये काय बोलणे झाले ?
ही चर्चा तेव्हा झाली आहे, जेव्हा सुशांत प्रकरणात मुंबई पोलीस कारवाई करत होते. अनेक लोकांची चौकशी सुरू होती. या चौकशी दरम्यान एका डीसीपींनी सतत त्या व्यक्तीच्या संपर्कात राहाणे, जिच्यावर अनेक प्रकारचे आरोप केले गेले आहेत, हे मनात प्रश्न निर्माण करणारे आहे. प्रश्न हादेखील उपस्थित होतो की, या फोन कॉलदरम्यान दोघांमध्ये कोणती चर्चा झाली, कोणत्या माहितीची देवाण-घेवाण झाली? रियाने डीसीपींशी कोणती चर्चा केली? डीसीपींनी का सतत संपर्क साधला? आता या सर्व प्रश्नांची उत्तरे रिया देऊ शकते किंवा डीसीपी अभिषेक त्रिमुखे. कॉल डिटेल्समुळे मुंबई पोलिसांच्या अडचणी वाढू शकतात का, असाही प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आहे.