धक्कादायक ! ‘सुशांत करु शकतो मग आपण का नाही ?’, असं लिहून 10 वी च्या विद्यार्थ्यानं गळफास घेऊन केली आत्महत्या

बरेली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मागील अनेक दिवसांपासून तो डिप्रेशनमध्ये होता तसेच त्याच्यावर उपचार सुरु होते असे मित्रांकडून सांगण्यात येत आहे. सुशांतने टोकाचे पाऊल का उचललं असा प्रश्न त्याच्या अनेक चाहत्यांना पडला आहे. अशातच उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका दहावीच्या मुलानं सुशांतच्या आत्महत्येची बातमी पाहून स्वत:चे आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बरेलील एका दहावीत शिक्षणाऱ्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याने सुसाईड नोटमध्ये लिहलं आहे की, जर अभिनेता सुशांत राजपूत आत्महत्या करू शकतो तर मी का नाही, दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याने सुसाईडनोट लिहून पंख्याला गळफास घेतला.

सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की, त्याच्यात किन्नरसारखी लक्षण आहेत.त्याचा चेहराही मुलींसारखा दिसतो. त्यामुळे लोक त्याची खिल्ली उडवतात. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरु केली. आत्महत्या केलेल्या मुलाच्या आईचे निधन झाले आहे तर वडिल मोबाइल दुरुस्तीचे काम करतात. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने, चेहरा मुलींसारखा दिसतो. लोक अनेकदा त्यावरून मस्करी करतात, त्यामुळे आता मलाही स्वत:वर संशय येऊ लागला आहे. माझ्याकडे सध्या आत्महत्या करण्याशिवाय काहीच मार्ग नाही. मी जर आत्महत्या केली नाही तर माझ्या वडिलांना लोकांचे टोमणे ऐकावे लागतील.

मी किन्नर असल्याचं समजताच लोक वडिलांचीही मस्करी करतील. त्यासाठी माझं मरणं गरजेचे आहे, असे त्याने सुसाइड नोटमध्ये लिहले आहे. तसेच मी गाणी गातो, मला लहान मुलांना शिकवण्याची इच्छा होती असंही त्याने लिहले आहे. मुलाची सुसाईड नोट वाचून वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. माझा मुलगा चांगली चित्र काढत होता. त्याच्या शाळेतील शिक्षिकाही त्याचं कौतुक करत होत्या. तसेच या सुसाईड नोटमध्ये मुलाने माझ्या अंत्यसंस्काराला अशा लोकांना बोलावू नका जे माझा तिरस्कार करतात. त्याने आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरलेलं नाही. आत्महत्या केलेल्या मुलाच्या लहान भावाने सांगितले की, आम्ही दोघे टीव्ही बघत होतो त्यावेळी सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी आली. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला की, सुशांत प्रमाणे आपल्या दोघांनाही असं फासावर लटकायला हवं. जेव्हा इतका मोठा स्टार आत्महत्या करु शकतो तर आपण का नाही करु शकत, असं त्याने आत्महत्या करण्यापूर्वी सांगितल्याचे लहान भावाने पोलिसांना सांगितले.