‘सुशांत’च्या प्रेमामुळे नागपुरात अल्पवयीन मुलाने केली आत्महत्या

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर नागपूरमधून सुन्न करणारी घटना घडली आहे. सुशांतचा चाहता असलेल्या 14 वर्षीय नयन मगनानी या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नयन मगनानी दिवंगत अभिनेता सुशांतचा फॅन होता. त्याच्या जाण्याने तो खूप तणावामध्ये होता. तणावातून नयन याने घरातील फॅनला लटकून गळफास घेतला. शहरातील जरीपटका परिसरातील हेमू कॉलनी चौक याठिकाणी ही घटना घडली आहे. इंद्रकुमार मगनानी हे शहरातील नामांकित बिल्डींग मटेरियल सप्लायर आहेत. त्यांचा मुलगा नयनकुमार हा दहावीचा विद्यार्थी असून त्याला मोबाईलचे वेड होते. घरात आईचा मोबाईल घेऊन तो सतत खेळायचा. त्यामुळे त्याला स्वतःच्या हक्काचा मोबाईल पाहिजे होता. त्याने आई-वडीलांना मोबाईल घेऊन मागितला होता. मात्र, त्यांनी दहावी पास झाल्यावर मोबाईल देईल, असे नयनला आश्वासन दिले. गेल्या काही दिवसांपासून नयन पुन्हा मोबाईल विकत घेऊन देण्यासाठी आईकडे तगादा लावायला लागला होता. मात्र, त्याच्या मागणीकडे आई-वडिलांनी दुर्लक्ष केले. मुलाने हट्ट केल्यामुळे त्याची समजूत घालून वेळ मारून नेण्यात आली. त्याने बुधवारी दुपारी साडेचार वाजता घरात घरात सिलींग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. खूप वेळ झाला तरी नयन बाहेर आला नाही, म्हणून त्याची आई रूममध्ये गेली. नयन अडकलेल्या अवस्थेत पाहून अचानक धक्का बसला. नयनच्या आत्महत्येप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.