2 महिन्यापर्यंत हॉटेलमध्ये कशामुळं राहिला सुशांत ? काय आहे भूत-प्रेत कनेक्शन ? CBI करणार चौकशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास करणार्‍या केंद्रीय अन्वेषण ब्यूरो इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) च्या टीमचे लक्ष आता मुंबईच्या वॉटर स्टोन हॉटेल-क्लबवर आहे. कुटुंबाचा आरोप आहे की, या रिसॉर्टमध्ये आल्यानंतर सुशांतसिंग आपल्या कुटूंबातून कट झाला होता. सुशांतला या रिसॉर्टमध्ये रिया घेऊन गेली होती. तो येथे 2 महिने राहिला होता.

अभिनेता सुशांतसिंग राजपूत वांद्रेच्या फ्लॅटमध्ये राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्या फ्लॅटमध्ये भूतबाधा असल्याची चर्चा होती, म्हणून तो वॉटर स्टोन हॉटेल-क्लबमध्ये राहिला होता. सीबीआयच्या टीमने काल या हॉटेलमधील स्टाफ मॅनेजरशी चौकशी केली आहे. या दरम्यान सुशांत येथे राहत होता तेव्हा त्याला कोण-कोण भेटायला आले होते याची माहिती सीबीआय गोळा करत आहे.

सीबीआयने हॉटेल वॉटर स्टोन हॉटेल-क्लबच्या सीसीटीव्हीबद्दलही माहिती गोळा केली आहे. रिया चक्रवर्ती आध्यात्मिक गुरू महेश जोशी यांना हॉटेलमध्ये घेऊन आली होती. महेश जोशी यांनी सुशांतचे आध्यात्मिक उपचार केले होते. अध्यात्मिक गुरू महेश जोशी यांचीही सीबीआय चौकशी करणार आहे.

सीबीआयकडे अनेक प्रश्न आहेत, ज्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. पहिला प्रश्न, सुशांत दोन महिने या हॉटेलमध्ये का राहिला? दुसरा प्रश्न – कोणाच्या सांगण्यावरुन तो थांबला? तिसरा प्रश्न- फ्लॅटमध्ये भुत-प्रेतचे सत्य काय आहे?

संदीप एक वर्ष सुशांतशी बोलला नाही

एका वृत्तसंस्थेला चित्रपट निर्माते संदीप सिंगचा कॉल रेकॉर्ड मिळाला आहे. गेल्या एक वर्षात संदीप सिंगने सुशांतला फोन केला नसल्याचे कॉल रेकॉर्डमधून समोर आले आहे. संदीप स्वत: ला सुशांतचा मित्र म्हणत असे, परंतु सुशांतच्या कुटूंबाला संदीप सिंगबद्दल काहीच माहिती नाही.

जेव्हा सुशांतच्या कुटुंबीयांना संदीप माहित नाही आणि संदीपने अभिनेता सुशांत राजपूतशी 1 वर्ष बोललाही नाही, तर सुशांतच्या मृत्यूनंतर संदीप रुग्णालयात कसा पोहोचला. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी या दरम्यान संदीप दुबईला कितीवेळा आणि का गेला असा प्रश्न उपस्थित केला आहे. याविषयी त्याच्याकडे चौकशी केली पाहिजे.