5 दिवसात रियानं सुशांतला केले 25 फोन, अभिनेत्यानं कुटुंबाकडे मागितली होती मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दररोज नवीन गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात प्रत्येकाची नजर रिया चक्रवर्तीवर आहे. आता रिया चक्रवर्तीचे कॉल डिटेल्सही उघड झाले आहेत.

या कॉल डिटेलनुसार, सुशांत जेव्हा २० ते २४ जानेवारी २०२० पर्यंत आपली बहीण राणीला भेटायला चंदीगडला गेला होता, तेव्हा रियाने ५ दिवसात सुमारे २५ फोन केले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतने नोव्हेंबरमध्ये आपल्या बहिणीकडे मदत मागण्यासाठी फोन केला होता आणि चंदीगडला जाण्यासाठी तीन बहिणींसोबत तिकीटही बुक केले होते. मात्र रिया चक्रवर्तीने त्याला ब्लॅकमेल केले आणि थांबण्यास सांगितले.

त्यानंतर डिसेंबरमध्ये सुशांतने एका नव्या नंबरवरून फोन करून मदत मागितली. सुशांत म्हणाला की, रिया आणि तिचे कुटुंबीय त्याला मानसिक रुग्णालयात पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला मानसिक रुग्णालयात जायचे नाही. तो मुंबईतून सर्वकाही संपवून हिमाचलमध्ये कुठेतरी स्थायिक होईल.

त्यानंतर तो गाडीने निघून गेला. गाडी त्याने स्वतः चालवली, कारण चुकीची औषधे घेतल्यामुळे तो क्लॉस्ट्रोफोबियाची तक्रार करत होता. सुशांत स्वत: गाडी चालवून चंदीगडला गेला आणि तेथे २ दिवस राहिला. दरम्यान सिद्धार्थ पिठानीने रियाला त्याच्या येण्याबद्दल सांगितले, त्यानंतर रियाने त्याला परत येण्यासाठी ब्लॅकमेल केले आणि ३-४ दिवसांत २५ वेळा फोन केला.

सुशांतच्या मृत्यूमधील गोंधळ

सुशांत सिंह राजपूतचे १४ जून २०२० रोजी निधन झाले होते. त्याने त्याच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये फाशी घेतली होती. सुशांत हा नैराश्याचा शिकार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र त्याने एवढे मोठे पाऊल का उचलले हे अद्याप कळू शकलेले नाही.

यापूर्वी सुशांतच्या मृत्यूचे कारण म्हणजे बॉलिवूडमधील नेपोटीज्म आणि समूहवाद मानले जात होते. पण सुशांतचे वडील केके सिंह यांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या विरोधात एफआयआर दाखल करून या प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे.