SSR Death Case : NCB ची मोठी कारवाई ! शोविक आणि मिरांडाला ड्रग देणाऱ्या पेडलरला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) शनिवारी सकाळपासूनच मोठी कारवाई केली असून संपूर्ण प्रकरणातील ड्रग नेटवर्कला अटक केली आहे. अशी बातमी आहे की, करमजित नावाची व्यक्ती सॅम्युअल मिरांडा आणि शोविक चक्रवर्ती यांना ड्रग्ज पुरवत असे आणि नंतर ते सुशांतसिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांच्याकडे पोहचत होते. करमजित कॅपरी आणि लिटल हाइट्समध्ये ड्रग्स पुरवत असे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) आज सकाळपासूनच मोठी कारवाई करण्यात गुंतले आहे. एनसीबीची टीम सकाळपासूनच मुंबई आणि गोव्यात मोठ्या प्रमाणात छापे टाकत आहे आणि अजूनही ते सुरू आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूडमध्ये ड्रग्जच्या संबंधात ही छापेमारी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ड्रग प्रकरणात आतापर्यंत ज्या लोकांची चौकशी करण्यात आली आहे, त्यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांना या संपूर्ण नेटवर्कची माहिती दिली होती. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने गोव्याहून अनेकांना ताब्यात घेतले. अशी माहिती आहे की, आणखी काही ड्रग पेडलरना अटक केली जाऊ शकते. या सर्व ड्रग पेडलरकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आली आहेत.

23 वर्षीय अब्देल बासित परिहार आणि 21 वर्षीय आरोपी झैद विलात्रा यांना नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो टीमने शोविक चक्रवर्ती आणि सम्युल मिरांडा यांच्या कित्येक तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती. या सर्व लोकांवर ड्रग व्यवसायाचा आरोप आहे आणि एनसीबीच्या टीमने या सर्वांना अटक केली आहे.