मृत्यूच्या पहिल्या दिवसापर्यंत सुशांतच्या आयुष्यात सर्व काही ठीक होतं ? बँक डिटेल्स वरून उपस्थित होतायत ‘हे’ 13 प्रश्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय आणि एनसीबीकडून सुरु आहे. या प्रकरणात ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर सुशांतची लिव्ह-इन पार्टनर रिया चक्रवर्ती सध्या भाईखला तुरूंगात आहे. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीही 14 दिवस न्यायालयीन कोठडीत आहे. आज दोघे जामिनासाठी उच्च न्यायालयात जाऊ शकतात. दरम्यान, न्यूज 18 ला सुशांत सिंहच्या बँकेचा तपशील प्राप्त झाला आहे, जो त्याच्या मृत्यूच्या एक दिवस आधी म्हणजे म्हणजे 13 जूनपर्यंत आहे. सुशांत 14 जून रोजी आपल्या अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता.

सुशांतच्या बँक डिटेल्समुळे बरेच प्रश्न निर्माण होतात. प्रश्न होता की 13 जूनपर्यंत सुशांतच्या आयुष्यात सर्व काही सामान्य होते का? असल्यास, 14 जून रोजी अचानक काय झाले? तो गूढपणे कसा काय मरण पावला? कारण, प्रत्येक महिन्याप्रमाणेच सुशांत सर्व जबाबदाऱ्या पार पाडत होता. त्याच्या बँक खात्याचा तपशील बघून याचा अंदाज येतो.

सुशांत सिंह राजपूतच्या बँकेचे तपशील काय आहेत

1) 13 जून 2020 रोजी सुशांतने 29 हजार रुपयांचं पेमेंट केलं. त्याने त्याच्या काही खेळांशी संबंधित गोष्टींसाठी हे पैसे दिले होते.

2) 13 जून 2020 रोजी सुशांतने डॉक्टरांना 10 हजार रुपये कन्सल्टन्सी फी दिली होती.

3) 13 जून रोजी त्याने त्याच्या बँक खात्यातून 4500 रुपये ट्रान्सफर केले.

4) 11 जून रोजी त्याने आपल्या फ्लॅटचे भाडे 3 लाख, 87 हजार रुपये दिले. हे बँक तपशिलामध्ये देखील लिहिलेले आहे.

5) 8 जून 2020 रोजी सुशांतने एका खात्यातून दुसर्‍या खात्यात 50 हजार रुपये ट्रान्सफर केले.

6) 10 हजारांच्या व्यवहाराचा तपशील 8 जून 2020 रोजी पाहता येईल. मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून त्याने हे केलं होतं.

7) 8 जून 2020 रोजी सुशांतने अजिम ट्रॅव्हल्सला 12 हजार 832 रुपये दिले.

8) त्याच दिवशी त्याने आपल्या फॉर्म हाऊस पवाना मधील कर्मचार्‍यांना 46 हजार 400 रुपये पगार दिला.

9) 8 जून 2020 रोजी सुशांतने आपल्या कुत्र्यासाठी अन्न खरेदी करण्यासाठी 6,200 रुपये दिले.

10) 8 जून 2020 रोजी सुशांतने आपल्या स्टाफ नीरजचा पगार 15 हजार 820 रुपये दिले होते.

11) 8 जून रोजी 20 हजार रुपयांचा तपशील देखील पाहता येईल.

12) 28 मार्च 2019 रोजी सुशांतच्या बँक खात्यातून 40 हजार रुपयांचा व्यवहार झाला आहे. छिछोरे चित्रपटाची सक्सेस पार्टी सुशांतच्या पवना फॉर्म हाऊसमध्ये झाली होती.

13) 28 मार्च रोजी 40 हजारांचा आणखी एक तपशील PAWNA CHICHORE पार्टीसाठी पाहता येईल. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पार्टीतच ड्रग्जचा वापर केला गेला होता.