सुशांत राजपूत आत्महत्या : कुटुंबिय मुंबईत पोहचण्यापुर्वीच रात्री 12.30 वाजता केला ‘पोस्टमॉर्टम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत हळूहळू अनेक प्रश्न समोर उभे राहू लागले आहेत. सुशांतच्या पार्थीवाचे पोस्टमार्टम संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. यामध्ये जो मुख्यप्रश्न आहे तो म्हणजे, सुशांत सिंह राजपूतचे पोस्टमार्टम इतक्या घाईघाईत का उरकण्यात आले. त्याच्या पोस्टमार्टमसाठी वडील येण्याची वाट का पाहिली नाही?

पोस्टमार्टम रिपोर्ट पाहिला तर ते 14 जूनला सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी रात्री 11 ते 12.30 वाजताच्या दरम्यान करण्यात आले होते. यादरम्यान सुशांतचे वडील किंवा कुटुंबाचा कोणीही सदस्य तेथे उपस्थित नव्हता.

ही शंका मुंबई पोलिसांच्या तपासावर मोठे प्रश्न उपस्थित करत आहे. पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये श्वास कोंडल्याने सुशांतचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. हे पोस्टमार्टम कुपर हॉस्पीटलमध्ये करण्यात आले होते.

14 जूनला सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह दुपारी 3:30 वाजता कुपर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला. 4 वाजेपर्यंत मेडिकल ऑफिसरने सुशांतच्या मृत शरीराची तपासणी केली आणि सुमारे 4 वाजता त्यास मृत घोषित केले.

कागदपत्र पूर्ण केल्यानंतर मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. रिपोर्टमध्ये समोर आले की, 14 जूनच्या रात्री सुशांतची ऑटोप्सी होईल, असे म्हटले आहे.

ज्यावेळी सुशांतचे पोस्टमार्टम करण्यात आले, त्यावेळी अनेक माध्यमांनी आपल्या रिपोर्टमध्ये या गोष्टीचाही उल्लेख केला होता की, जिया खानसारख्या जितक्या सेलेब्सने सुसाईड केली त्यांचे पोस्टमार्टम कुपर हॉस्पीटलमध्येच करण्यात आले. यामुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होणे सहाजिक आहे की, अखेर सर्व सेलेब्सच्या वादग्रस्त सुसाईड केसेसमध्ये पोस्टमार्टम कुपरमध्ये का केले जाते. पोस्टमार्टम रिपोर्टमधील मृत्यूचे कारण हा मजबूत पुरावा मानला जातो.

पोस्टमार्टमनंतर फॉरेन्सिक टीमने सुशांतचा व्हिसेरा रिपोर्टसाठी सुरक्षीत ठेवला होता. सुशांतचा व्हिसेरा रिपोर्टसुद्धा 16 दिवसानंतर आला, ज्यामध्ये म्हटले होते की, सुशांतच्या शरीरात कोणतेही संशयास्पद केमिकल किंवा विष आढळले नाही, आणि हे आत्महत्येचे प्रकरण आहे.

काही दिवसांपूर्वी जेव्हा सुशांतचे वडील के के सिंह यांनी बिहार पोलीस ठाण्यात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या विरोधात एफआयआर दाखल केली, त्यानंतर प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. बिहार पोलीस वेगाने कारवाई करत आहेत.

सध्या बिहार पोलीसचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटले की, मुंबई पोलीस अगोदर मदत करण्यास तयार होते, परंतु अचानक एक कॉल आला आणि ते बदलले. सुशांतची मॅनेजर दिशा सालियनच्या सुसाईड तपासाचे रिपोर्ट मागितले असता मुंबई पोलिसांनी तो फोल्डर डिलीट झाल्याचे सांगितले.

आतापर्यंत या केसमध्ये रिया चक्रवर्ती मुख्य आरोपी समजली जात आहे. तिच्यावर सुशांतच्या वडीलांनी पैशांची अफरातफर करणे आणि मुलाला लांब ठेवल्याचा आरोप केला आहे.