राष्ट्रगीत गातानाचा सुशांत सिंह राजपूतचा व्हिडीओ व्हायरल, Video पाहून चाहते झाले भावुक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सुशांत सिंह राजपूतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सुशांत राष्ट्रगीत गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ तसा खूप जुना आहे आणि क्रिकेट मॅचच्या आधी झालेले राष्ट्रगीत आहे. या व्हिडिओमध्ये सुशांतला पाहून चाहते अधिक भावूक झाले आहेत. हा व्हिडीओ कमी वेळात खूप वेळा पाहिला गेला कमेंट्सही मोठ्या प्रमाणात येत आहेत.

एकाने कॉमेंट करत लिहिलं – ‘तू कधी मरू शकत नाही SSR. भले तू शरीराने आमच्यात नाहीस पण तू कधी मरू शकत नाही’. अजून एका यूजरने लिहिलं की,’आमचं प्रेम तुझ्यावर नेहमी राहील सुशांत’.

14 ऑगस्टला सुशांतच्या आत्महत्येला दोन महिने पूर्ण झाली. त्यानंतर त्याचे कुटुंब आणि लोकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुशांत 14 जूनला त्याच्या बांद्रा येथील फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. या प्रकरणात आत्तापर्यंत 40 पेक्षा अधिक लोकांची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या निधनाने बॉलिवूडलाच नाही तर त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. सुशांतशी संबंधित अनेक पोस्ट त्याच्या बहिणी श्वेता आणि कीर्ती सोशल मीडियावर शेअर करतात.