‘सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी तीनही खान गप्प का ?’,भाजपाच्या ‘या’ नेत्याचा सवाल

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतचं निधन होऊन जवळपास 3 आठवडे होऊन गेले आहेत. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. चाहते तर अजूनही सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. राजकीय वर्तुळातही याची खूप चर्चा होत आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सोशलवर यासंदर्भात ट्विट केलं आहे. त्यांनीही या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. विशेष बाब अशी की, त्यांनी बॉलिवूडमधील शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान अशा तीनही खानवर निशाणा साधला आहे.

स्वामींचा तीनही खानवर निशाणा

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केलं की, “यावेळी बॉलिवूडचे तीन खान शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान सुशांतच्या सो कॉल्ड आत्महत्येप्रकरणी गप्प का आहेत ?” असा सवाल स्वामींनी केला आहे.

सुब्रमण्यम यांनी ट्विट करताच यावर अनेक युजर्स कमेंट करू लागले. एका युजरनं कमेंट केली की, अभिनेता संजय दत्त याला जेव्हा तुरुंगवास झाला होता तेव्हा संपूर्ण बॉलिवूड त्याच्या समर्थनार्थ उतरलं होतं. परंतु सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी असं काहीही होताना दिसत नाही. यावेळी काहींनी तर बॉलिवूड स्टार अक्षय कुमारवरही निशाणा साधला आहे. काहींनी अक्षय कुमारेच सिनेमे बॉयकॉट करण्याचीही मागणी केली आहे. इतर अनेकांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. यात जवळपास 30 लोकांचा समावेश आहे ज्यात त्याचे नोकर, कुटुंबीय, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, मित्र सिद्धार्थी पिटानी, सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचे डायरेक्टर मुकेश छाबडा, सुशांतचा आगामी सिनेमा दिल बेचारा मधील त्याची कोस्टार संजना संघी यांचा समावेश आहे. अलीकडेच पोलिसांनी बॉलिवूड डायरेक्टर संजय लीली भन्साळी यांचीही चौकशी केली आहे.