‘या’ मॉडेलसोबत अभिनेत्री सुश्मिता सेन राहते लिव्ह इनमध्ये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सुश्मिता सेन अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुश्मिता सेन, मॉडेल रोहमन शॉलला डेट करण्याच्या चर्चा सुरु आहेत. सुश्मिताने आजवर रोहमनचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अशीही माहिती समोर आली आहे की, सुश्मिता तिच्या आणि रोहमनच्या नात्याला पुढे नेऊ इच्छित आहे. शिवाय आणखी एक माहिती अशी समजली आहे की, दोघे लिव्ह इनमध्ये रहात आहेत.

या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, मॉडेल रोहमन शॉल हा आता सुश्मिता सेनच्या घरी शिफ्ट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुश्मिताच्या बांद्र्यातील घरी रोहमन रोज येत जात होता. रोहमनचे सुश्मिताच्या दोन्ही मुलांशीदेखील चांगले जुळले आहे. यानंतर आता रोहमन आणि सुश्मिता यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.

रोहमन आणि सुश्मिता हे दोघे एका इव्हेंटमध्ये भेटले होते. यानंतर दोघांची मैत्री झाली नंतर याच मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते बिन्धास्त एकत्र फिरताना दिसत आहेत. इतकेच नाही तर, सुश्मिताला रोहमनने लग्नासाठी प्रपोजही केले आहे. सगळे सुरळीत झाले तर, नव्या वर्षात दोघेही विवाहबद्ध होतील असं समजत आहे. सध्या सुश्मिता स्क्रीन पासून तर दूर असल्याचे दिसत आहे. परंतु रोमान्स, लुक आणि रोहमन मुळे ती अनेकदा चर्चेत असते.

रोहमन शॉलच्या आधी सुश्मिता सेन रितिक भसीनला डेट करत होती. दरम्यान दोघांचे ब्रेकअप झाल्यानंतर सुश्मिता रोहमनची भेट झाली. त्यानंतर ती रोहमनला डेट करू लागली.