अ‍ॅन्टी करप्शनच्या सापळ्याचा संशय आल्याने फलटणच्या DySp ने केले ‘हे’ कृत्य

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – फलटणच्या लाच प्रकरणात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फलटणचे डीवायएसपी डॉ. अभिजीत पाटील यांना अ‍ॅन्टी करप्शनच्या सापळ्याचा संशय आल्याने रक्कम न स्विकारता तक्रारदारालाच आपल्या गाडीतून पळवून नेले. त्यानंतर तक्रारदाराजवळील मोबाईल व व्हॉईस रेकॉर्डर हिसकावून घेत त्याला गाडीतून ढकलून दिले. त्यांचा मोबाईल फोडून व्हाईस रेकॉर्डर फेकून दिला. हा धक्कादायक प्रकार असून पाटील यांच्या या कृत्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५१ वर्षीय व्यक्तीने अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार खंडाळा पोलीस ठाण्यात भा.द.वि.सं.क.४२०,३४ गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात तक्रारदार यांचा ८ लाख रुपयांचा डी.डी. त्यांना मिळवून देण्यासाठी डीवायएसपी पाटील यांनी २ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शनकडे याची तक्रार केली. अडीच लाखांपैकी १ लाख ७५ हजार रुपये स्विकारण्याची तयारी पाटील यांनी दाखवली. त्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचला. मात्र पाटील यांना या सापळ्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी ती लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून स्विकारली नाही. त्यानंतर त्यांनी तक्रारदारालच गाडीत बसवून पळवून नेले. त्यांचा मोबाईल आणि अ‍ॅन्टी करप्शनने दिलेला शासकीय व्हाईस रेकॉर्डर जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यानंतर त्यांनी गाडीतून ढकलुन देत त्यांचा मोबाईल फोडला. आणि शासकीय व्हाईस रेकॉर्डर फेकून दिला. तो कुठे फेकून दिला. याचा तपास पथक करत आहे.

या प्रकरणात अपहरण आणि जबरी चोरीचे कलम लागणार का ? याची चर्चा सुरु आहे. ऐन निवडणूकीच्या धामधुमीत बडा अधिकारीच लाच प्रकरणात अडकल्याने आणि त्यांनी केलेल्या कृत्यामुळे पोलीस दलात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे. तर पोलीस दलासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

कोण आहेत डॉ. अभिजीत पाटील

डीवायएसपी डॉ. अभिजीत पाटील मुळचे कोल्हापूरचे रहिवासी आहेत. त्यांनी सांगलूमधून वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज मधून शिक्षण पुर्ण केले. २०११ साली लोकसेवा आयोगाची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. त्यांनी १४ जूलै २०१८ रोजी फलटण उपविभागीय अधिकारी पदाचा चार्ज घेतला होता. त्यांची अप्पर पोलीस अधिक्षक पदी बढतीही होणार होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like