‘ही’ गोष्ट केली तर राहणार नाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, याकडं दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जास्तीत जास्त लोक फिट आणि सुंदर दिसण्यासाठी वजन कमी करण्याचा विचार करतात. वजन कमी केल्याने आरोग्याला सुद्धा अनेक फायदे मिळतात. तसेच वजन कमी करुन तुम्ही वेगवगेळ्या आजरांना दूर ठेवू शकता आणि यात ब्रेस्ट कॅन्सरचा देखील समावेश आहे.

‘या’ वयातील महिलांना सर्वाधिक धोका कमी

पन्नास पेक्षा अधिक वय असलेल्या महिलांनी वजन कमी केलं आणि ते कमी केलेलं वजन नियंत्रित ठेवलं तर अशा महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका अनेक पटीने कमी होतो, असे जर्नल ऑफ नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या JNCI च्या प्रकाशित केलेल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं. तसेच रिसर्चमध्ये सहभागी टीमला असे सुद्धा आढळून आलं की, ज्या महिलांनी वजन कमी केलं, त्या पोस्ट मेनोपॉजल हार्मोन्सचे सेवन सुद्धा करत नव्हत्या.

ब्रेस्ट कॅन्सरचा कमी धोका

यापूर्वीच्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं होत की, बॉडी मास इंडेक्स अधिक असेल तर त्याने पोस्टमेनॉपॉजल ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. मात्र असा एकही रिसर्च करण्यात आला नव्हता ज्यामाध्यमातून हे सांगितलं जाईल की, वजन कमी केल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो किंवा नाही. हेच कारण की, अमेरिकन कॅन्सर सोसायटी आणि हार्वर्ड टी एच चॅन स्कुल ऑफ पब्लिक हेल्थच्या अभ्यासकांनी हा रिसर्च करण्याचा विचार केला.

तब्बल एक लाख ८० हजार महिलांवर रिसर्च

या रिसर्चकरता तज्ज्ञांनी ५० वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक वयाच्या १ लाख ८० हजार महिलांची तपासणी केली. या रिसर्चच्या निष्कर्षातून समोर आलं की, वजन कमी केल्याने या वयातील महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका अनेक पटीने कमी झाल्याचं दिसून आलं.