काय सांगता ! होय, कोरोनाचा सामना करण्यासाठी ‘गोमूत्र’ पार्टी, मातीच्या भांडयातून ‘प्राशन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. सावरकर, जेएनयू, राहुल गांधी यांच्यावर त्यांची अनेक वादग्रस्त विधाने आहेत. चीननंतर आता कोरोनाची भीती भारतात पसरली आहे आणि त्याची भीती दिल्लीत निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत स्वामी चक्रपाणी यांनी शनिवारी कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी दिल्लीत गोमूत्र पार्टी आयोजित केली आहे.

गोमूत्र पार्टीबद्दल स्वामी चक्रपाणी म्हणाले, ‘देशात कोरोना व्हायरसची भीती वाढत आहे पण आपल्या जीवनशैलीत तो टाळण्याचा एक मार्ग आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आम्ही दिल्लीत गोमूत्र पार्टी आयोजित करीत आहोत, जिथे पहिले हवन होईल, कुल्हडमध्ये गोमुत्र प्यायला दिले जाईल. त्यानंतर भजन होईल.’स्वामी चक्रपाणी यांना जेव्हा विचारले गेले की, गोमूत्रमुळे कोरोना व्हायरस बरा होईल किंवा त्यापासून बचाव कसा करावा ? त्यानंतर स्वामी चक्रपाणी म्हणाले, ‘गोमूत्रात 32 प्रकारचे घटक आहेत ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कायम राहते. गोमूत्र पिल्यानंतर कोरोना होणार नाही, जर कोणाला कोरोना झाला तर हळू हळू गोमूत्र पिल्याने ते ठीक होईल.त्यांना विचारले गेले की, हे तुम्ही विश्वासाच्या आधारे बोलता की वैज्ञानिक तपासणीच्या आधारे तेव्हा स्वामी चक्रपाणी म्हणाले, ‘हा विश्वासाचा विषय आहे.

शास्त्रामध्ये देखील गोमूत्र शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्याची शक्ती आहे. बर्‍याच देशांमध्ये आमच्या शाखा आहेत, आम्ही अशी पार्टी संपूर्ण भारतभर करू आणि कोरोनाविरुद्ध बचाव करण्याची तयारी करू.’ यावर स्वामी चक्रपाणींना विचारले की, चीनमध्येही तुमची शाखा आहे का ? सर्वात जास्त मृत्यू तिथे कोरोनामुळे झाले आहेत. यावर स्वामी चक्रपाणींनी उत्तर दिले, ‘चीनमध्ये आमची कोणतीही शाखा नाही. प्राणिमात्रांना ठार मारल्यानंतर करुणाच नष्ट झाली, म्हणूनच चीनमधील जीवांमुळे कोरोना निर्माण झाला ज्यामुळे तिथे या रोगाचा प्रसार झाला. भारतात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही प्राण्यांच्या कल्याणासाठी बोलत आहोत.’