‘राम-सीते’सोबत कशी होती बाँडिंग ? ‘उत्तर रामायण’मधील ‘कुश’ स्वप्निल जोशीनं शेअर केल्या खास आठवणी !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  रामानंद सागर यांच्या उत्तर रामायण आणि रामायण या मालिकांनी सगळेच टीआरपी रेकॉर्ड तोडले आणि या मालिका पुन्हा एकदा लोकप्रिय झाल्या. स्वप्निल जोशीनं उत्तर रामायण मालिकेत कुशच भूमिका साकारली होती. आज तो मराठी सिनेमात खूप लोकप्रिय आहे. स्वप्निलनं काही आठवणी शेअर केल्या आहेत. एका मुलाखतीत तो बोलत होता.

स्वप्निल जोशी म्हणाला, “मी रामायण पाहिली होती. माझे कुटुंबीयदेखील रामायणचे चाहते होते. तेव्हा स्वप्नातही कोणी विचार केला नसेल की, मी उत्तर रामायण मध्ये कुश ची भूमिक साकारेन.”

अरुण गोविल, दीपिका आणि सुनीलसोबहत बाँडिंग

स्वप्निल सांगतो की, “माझे जास्तीत जास्त सीन हे सीता मय्या म्हणजेच दीपिकाजी सोबत असायचे. शेवटी राम म्हणजेच अरुणजीसोबत काम केलं. त्यांनी आमची खूप काळजी घेतली. अगदी आम्हाला त्यांनी मुलाप्रमाणंच ट्रीट केलं.”

स्वप्निल सांगतो धार्मिक मालिकांसोबत चाहत्यांचं एक कनेक्शन बनत असतं. मला खूप आनंद आहे मी अशा एका मालिकेचा हिस्सा बनलो आहे. लोक जेव्हा मालिका पाहतात तेव्हा त्याच्यासोबत कनेक्ट होतात.