गावकर्‍यांनी बिबट्याची काढली मिरवणूक, व्हिडीओ पाहून स्वरा भास्कर भडकली

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बिबट्याला मारुन त्याच्या मृतदेहाची गावकर्‍यांनी मिरवणूक काढली. या कृतीबाबत बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या फोटो आणि व्हिडिओमुळे स्वराने संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर एका मृत बिबट्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये गावकरी बिबट्याच्या मृतदेहाची मिरवणूक काढताना दिसत आहेत.

ही घटना आसाममधील गुहावटी येथील असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकारावर स्वराने संताप व्यक्त केला आहे. भयानक घटना असे स्वराने याला प्रकाराला म्हटले आहे. स्वराच्या मतांशी अभिनेत्री आथिया शेट्टी देखील सहमत आहे. तिने स्वराचे ट्विट रिट्विट करुन त्यावर हे अगदी घृणास्पद आहे. अशा आशयाची कमेंट केली आहे.

स्वराचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकर्‍यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्वरा यापूर्वी मजुरांना केलेल्या मदतीमुळे चर्चेत होती. तिने मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी सोनू सूदला मदत केली होती. तिला लेडी सोनू सूद असेही म्हटले जात होते. मजुरांना मदत करताना काढले गेलेले तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते.