आता विसरा FD आणि बचत खाते ! बँकेच्या ‘या’ सुविधेचा ‘लाभ’ घेतल्यास होईल ‘भरघोस’ फायदा, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्त संस्था – अनेकदा असे होते की, आपल्याकडे रेग्युलर इन्व्हेस्टमेंट शिवाय इतर असे अनप्लॅन्ड फंड असतात जे आपल्या बचत खात्यात पडलेले असतात. ही रक्कम आपण काढतही नाही आणि कुठे गुंतवतही नाही. बहुतांश लोक असे पैसे फिक्स्ड डिपॉजिटमध्ये ठेवणे पसंत करतात. परंतु, याशिवाय एक असा पर्याय आहे, जेथे या पैशातून एफडी पेक्षा जास्त व्याज मिळवू शकता. ही रक्कम तुम्ही स्वीप-इन-डिपॉजिटमध्ये जमा करून अधिक व्याज मिळवू शकता.
काय आहे स्वीप-इन-डिपॉजिट ?
स्वीप-इन सुविधेच्या मदतीने बँक तुम्ही गुंतवलेल्या रक्कमेला तुमच्या सेव्हिंग अकाउन्टमधून स्वीप-इन-डिपॉजिटमध्ये ट्रान्सफर करते. या स्वीप-इन-डिपॉजिटचा अवधी 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंत असतो. कालावधीच्या आधारे या डिपॉजिटवर व्याज दर सुद्धा ठरवला जातो. मोठ्याप्रमाणात गुंतवलेल्या या डिपॉजिटमध्ये ठेवलेल्या पैशांवर तुम्हाला जास्त व्याज मिळते.
काय आहेत विविध बँकांचे नियम
विविध बँकांचे या सुविधेचे नाव वेगवेगळे असते. जसे भारतीय स्टेट बँकेमध्ये सेव्हिंग प्लस अकाउन्टच्या मदतीने हे काम होते. या सुविधेच्या मदतीने एसबीआय सेव्हिंग अकाउन्टमध्ये जरूरीपेक्षा जास्त रक्कम असेल, ती ऑटोमेटिकली स्वीप-इन-डिपॉजिटमध्ये ट्रान्सफर करते. परंतु, लक्षात ठेवा ही रकम 1,000 रुपयांच्या पटीत असली पाहिजे. एचडीएफसी बँकेत या सुविधेला स्वीप-इन फिक्स्ड डिपॉजिट आणि आयसीआयसीआय बँकेत या सुविधेला फ्लेक्सी डिपॉजिट म्हटले जाते. स्वीप इन सुविधा आणि फ्लेक्सी डिपॉजिटमध्ये फरक आहे. फ्लेक्सी डिपॉजिटमध्ये बँक स्वताच सरप्लस फंड डिपॉजिटमध्ये टाकते. तर, स्वीप-इन सुविधेत तुम्हाला मॅन्युअली सुरू करावी लागते, ज्यात तुम्ही सरप्लस फंड ट्रान्फर करण्यासाठी तुमच्या सेव्हिंग अकाउन्टशी लिंक करता.
कोण घेऊ शकतात या सुविधेचा लाभ
स्वीप-इन सुविधा बँकेच्या सर्व ग्राहकांसाठी नाही. यासाठी प्रत्येक बँकेचा वेगळा क्रायटेरिया असतो. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला किमान 25 हजार रुपयांचे एफडी खाते उघडावे लागते.
काय आहे याचा फायदा
या डिपॉजिटवर केवळ जास्त व्याजच नव्हे, तर आणखी एक फायदा आहे. या सुविधेच्या मदतीने तुम्ही आपल्यासाठी मोठी रक्कम सुद्धा तयार करू शकता. जी कोणत्याही आर्थिक अडचणीच्या वेळी उपयोगी येऊ शकते. छोट्या-छोट्या गरजांसाठी तुमच्या रेग्युलर इन्व्हेस्टमेंट किंवा एफडीची सुद्धा गरज पडणार नाही. जर तुम्ही वेळेपूर्वी ही रक्कम काढली तर तुम्हाला कोणताही दंड भरावा लागणार नाही.