T20 World Cup | यामुळे मॅच फिक्सिंग झाली होती,” जावेद मियाँदाद यांचा मोठा गौप्यस्फोट

पोलीसनामा ऑनलाईन टीम – ऑस्ट्रेलियात (Australia) नुकत्याच झालेल्या टी – 20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तानवर (Pakistan) मात करून इंग्लंडने (England) विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. यानंतर पाकिस्तानच्या टीमवर सडकून टीका केली जात आहे. यावेळी अनेक माजी खेळाडूनी आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद (Javed Miandad) यांनी विदेशी प्रशिक्षकांचा मुद्दा उपस्थित करत आक्षेप नोंदवला आहे. तसेच विदेशी प्रशिक्षक आणल्याने माजी खेळाडूंना राष्ट्रीय संघाचा भाग होण्याची संधी मिळत नाही असेदेखील ते म्हणाले. (T20 World Cup)

 

पाकिस्तान संघ व्यवस्थापनाची मानसिकता त्यांच्या खेळाडूंचं भविष्य असुरक्षित करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. तसेच भूतकाळात अशाच गोष्टी फिक्सिंगसाठी कारणीभूत ठरल्या होत्या असा सूचक इशारादेखील जावेद मियाँदाद यांनी यावेळी दिला.

 

यादरम्यान मियाँदाद यांनी मॅच फिक्सिंगबद्दल (Match Fixing) मोठा गौप्यस्फोट केला.
“आपल्या लोकांकडे पाहा, त्यांनी जे क्रिकेट खेळलं आहे ते पाहा. मी माझ्याबद्दल बोलत नाही आहे.
मला भूतकाळात अनेक ऑफर्स आल्या होत्या, पण मी गेलो नाही.
पण आज जे खेळाडू खेळत आहेत त्यांचं भविष्य काय आहे? मी आज चांगली कामगिरी केली नाही तर काहीच संधी मिळणार नाही हे त्यांना माहिती आहे.
याच कारणामुळे फिक्सिंग झाली होती. प्रत्येकाला आपलं करिअर संपेल अशी भीती वाटत होती,” असा खुलासा जावेद मियाँदाद यांनी केला आहे.

 

Web Title :- T20 World Cup | t20 world cup javed miandad revelation on match fixing after pakistan defeated by england t20 world cup loss

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Police Inspector Suicide | पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षकाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे प्रचंड खळबळ

ICC World Cup 2023 | भारत भूषवणार वर्ल्डकपचं यजमानपद, ‘या’ दहा शहरांत रंगणार सामना

Actress Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओनीने ठोठावले केरळ उच्च न्यायालयाचे दरवाजे, जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण?

Kieron Pollard IPL Retirement | कायरन पोलार्डची IPL मधून निवृत्ती; आता मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये पार पाडणार ‘ही’ जबाबदारी