मीडियाला पाहून ‘तैमूर’नं दिली ‘अशी’ रिअ‍ॅक्शन, सैफनंही केलं ‘असं’ काही (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन  – बॉलिवूड स्टार सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा लाडका तैमूर अली खान आपल्या क्युटनेसमुळं नेहमीच चर्चेत येत असतो. त्याचा एखादा फोटो किंवा व्हिडीओ नेहमीच सोशलवर व्हायरल होत असतो. पुन्हा एकदा आपल्या एका व्हिडीओमुळं तैमूर चर्चेत आला आहे. यात तैमूरचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. सध्या या व्हिडीओची खूप चर्चा होताना दिसत आहे.

तैमूरचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तो आई करीना कपूर सोबत दिसत आहे. अलीकडेच पतौडी कुटंबीय करिश्मा कपूरच्या घरी लंच साठी गेले होते. इथं तैमूर ज्या पद्धतीनं मीडियासोबत वागला आहे त्यानं साऱ्यांचंच मन जिंकलं आहे.

व्हिडिओत दिसत आहे की, तैमूर करीनासोबत गाडीतून उतरला आहे आणि सैफकडे गेला आहे. यानंतर तो मीडियाकडे पाहू लागला. यानंतर त्यानं फोटोग्राफर्सकडं पाहून सर्वांना HI केलं. तैमूरनं हाय केलेलं पाहून सैफनंही त्यां सर्वांना ग्रीट केलं. तैमूरचा हा व्हिडीओ साऱ्यांनाच आवडला आहे. तैमूरच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर ब्लॅक शॉर्ट आणि व्हाईट टीशर्टमध्ये तो खूपच क्युट दिसत होता.

तैमूरच्या या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे. अनेकांनी तैमूरच्या या वागण्याचं कौतुक केलं आहे. काही चाहत्यांनी कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.