Coronavirus : अमेरिका देखील अयशस्वी, पण चीनचा शेजारी तायवाननं केली ‘कोरोना’वर मात

नवी दिल्ली : चीनपासून हजारो मैल दूर असलेल्या देशांमध्ये आता कोरोना व्हायरस पोहचला आहे. परंतु चीनच्या अगदी जवळ असलेल्या तैवानने त्यास आपल्या घरात पसरू दिले नाही. आश्यर्चची बाब म्हणजे चीनमध्ये सुमारे 850,000 तैवानीज राहतात आणि काम करतात, अशा स्थितीत तैवान चीननंतर कोरोना प्रकोप असलेला दुसरा देश होऊ शकला असता, परंतु तसे झाले नाही.

इराण, अमेरिकासह अनेक देशात कोरोना वेगाने पसरत आहे. भारतातही कोरोना व्हायरसच्या प्रकरणांची संख्या 40 वर गेली आहे. परंतु कोरोना व्हायरसशी ज्यापद्धतीने तैवानने लढा दिला आहे, ते पाहता संपूर्ण जग त्यांच्याकडून धडा घेऊ शकतात.

ऑस्ट्रेलियाएवढी लोकसंख्या असलेल्या या बेटावर केवळ 45 केसस समोर आल्या आहेत आणि कोरोना व्हायरसने येथे एक मृत्यू झाला आहे, परंतु चीनमध्ये या संसर्गाची 80,000 प्रकरणे समोर आली आहेत. चीनच्या जवळील दक्षिण कोरिया, जपान, इटली आणि इराणमध्ये कोरोन मोठ्याप्रमाणात पसरला आहे.

कोरोना व्हायरस पसरण्याची वेळ चीनसाठी आणखी घातक ठरली आहे, कारण या काळात चीनमध्ये नवीन वर्षाच्या सुट्या असतात. चीनी पर्यटकांची संख्या वाढते. दुसरीकडे चीनने व्हायरसचा संसर्ग वाढेपर्यंत कोणतेही पाऊल उचलले नाही.

जेव्हा व्हायरसला तमाम देश समजू शकले नव्हते, तेव्हा तैवानने याच्याशी लढण्याची तयारी सुरू केली होती. जागतिक आरोग्य संघटनेचे संकेत मिळण्याची वाट पाहण्याऐवजी तैवानने यापूर्वीचे अनुभव लक्षात घेऊन कामाला लागणे पसंत केले.

ओरेगन स्टेट यूनिव्हर्सिटीमध्ये जन आरोग्य आणि मानव विज्ञानचे प्रोफेसर चुनहेई ची यांनी अलजजीरा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तैवान सार्स या भयंकर व्हायरसने यापुवीही खुप वाईट पद्धतीने प्रभावित झाला होता. यातून तैवानने मोठा धडा घेतला आहे. यावेळेला कोरोना व्हायरसच्या एंट्रीलाच तैवान पूर्ण तयारीनिशी उभा राहिला होता.

सार्सच्या महामारीनंतर तैवानने अशा संकटांना तोंड देण्यासाठी एक सेंट्रल कमांड तयार केले होते. कोरोना व्हायरसला तोंड देणार्‍या आशियातील अन्य देशांच्या तुलनेत तैवान एक पाऊल पुढे आहे.

कमांड सेंट्रलच्या कारणामुळे मेडिकल अधिकार्‍यांना डेटा एकत्र करणे, साधनांचे वितरण, संभाव्या केसेस आणि त्यांच्याशी संपर्काची यादी बनवणे सोपे झाले. व्हायरसचा संसर्ग झालेल्या रूग्णांना तातडीने आयसोलेट करण्यात आले.

तैवानने वुहानवरून येणार्‍या प्रत्येक प्रवाशाच्या आरोग्याची तपासणी सुरू केली होती. त्यावेळी हेदखील स्पष्ट झाले नव्हते की, हा व्हायरस माणसाकडून माणसाकडे पसरतो किंवा नाही.

सुपर अलर्ट
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच तैवानने सर्जिकल मास्क वितरीत करण्यास सुरूवात केली आणि चीनहून येणार्‍या प्रवाशांवर बंदी आणली होती. मकाऊ आणि हाँगकाँगहून येणार्‍या लोकांना 14 दिवस एकांतात ठेवण्यात आले.

सर्व सार्वजनिक इमारतींमध्ये हँड सॅनिटाइजर आणि फिवर चेक बंधनकारक करण्यात आले. एवढेच नव्हे, तैवान सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल व अन्य एजन्सीजने कोरोनाची नवी प्रकरणे आणि त्यांच्या द्वारे प्रवास केलेल्या ठिकाणांची माहिती नियमितपणे लोकांना एसएमएसद्वारे दिली.

स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये सेंटर फॉर पॉलिसी अँड प्रिव्हेन्शनचे डायरेक्टर जैसन वांग यांनी सांगितले की, तैवान सरकार आपल्या कारवाईत सुपर अलर्ट होते. जेव्हा हे स्पष्ट झाले की कोरोना एक मोठी समस्या होत आहे, तेव्हा त्यांनी आणखी पावले उचलण्यास सुरूवात केली.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तैवानप्रमाणेच सिंगापुरसुद्धा एक उदारहण आहे. आशियाचे व्यापारी केंद्र असूनही सिंगापुरमध्ये केवळ 100 प्रकरणे समोर आली आहेत. प्राथमिक जागृतता आणि सतर्कतेमुळे येथे कोरोना मोठ्या प्रमाणात पसरू शकला नाही.

सिंगापुरने सुद्धा जानेवारी महिन्यात चीनच्या प्रवाशांसाठी आपली सीमा बंद करण्यापूवी प्रवाशांना आरोग्य तपासणी बंधनकारक केली होती. याशिवाय, संशयित रूग्णांना 14 दिवस एकांतात राहण्याचा आदेश दिला होता, आदेश न पाळणार्‍यांना मोठी दंडही लावण्यात आला.

तैवान आणि सिंगापुरसारख्या छोट्या देशांच्या नेत्यांनी कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी पावले उचलण्यात घाई केली, तर कोरोनाशी लढणार्‍या मोठ्या देशांनी अ‍ॅक्शन घेण्यास खुप सुस्ती दर्शवली. धोका असूनही लोकांना यऊ दिले. एवढेच नव्हे अमेरिकेने सुद्धा याबाबतीत खुप उशीर केला.