आमचे वेतन घ्या, पण खासदार निधी कापू नका ! लोकसभेमध्ये नवनीत राणा यांची मागणी

पोलिसनामा ऑनलाईन : आमचे वेतन घ्या, पण खासदार निधी कापू नका, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेमध्ये पावसाळी अधिवेशनानिमित्त केली. यामुळे या विषयावर मोठी चर्चा सुरू झालीय.

कोरोनची लागण झाल्यानंतर तसेच कोरोनााशी लढा यशस्वी करीत अमरावतीच्या खासदार कामात रुजू झाल्या आहेत. आज लोकसभेत त्यांनी आपल्या मागण्या सादर केल्या.

लोकसभेत संसदेच्या सदस्यांचे वेतन, भत्ते, निवृत्तीवेतन दुरुस्ती विधेयक 2020 आज मंजूर केले. यानुसार खासदारांचे 30 टक्के वेतन पुढील वर्षासाठी कापण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्टून काढल्याप्रकरणी शिवसैनिकांनी माजी सैन्य अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती. या प्रकरणात आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मदन शर्मा यांना मारहाण करणार्‍या शिवसैनिकांवर कारवाई करावी, यासाठी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली. तसेच याबाबतचे निवेदन त्यांना दिले होते.

काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा नागपूरवरून मुंबईला उपचारासाठी आणले होते. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयाला कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यात नवनीत राणा यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईला रवाना केले होते. 6 ऑगस्ट रोजी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासह त्याच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली होती. नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आलाय.