Video : कर्करोगग्रस्त अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज ! चाहत्यांकडे मागितली आर्थिक मदत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   साऊथ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते थवासी (Thavasi) सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांना आता उपचारासाठी पैशांची खूप गरज आहे. फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

थवासी हे साऊथ सिनेमातील प्रसिद्ध कलाकार होते. ते आपल्या पिळदार शरीरयष्टीसाठी खूप फेमस होते. परंतु आता कर्करोगामुळं त्यांची अवस्था खूपच वाईट झाली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संपर्क साधताना ते म्हणाले, मी गेली अनेक वर्षे कर्करोगाशी लढत आहे. माझी सर्व संपत्ती मी उपचारासाठी खर्च केली आहे. आजारी असल्यानं गेल्या काही वर्षांत मी कामही केलेलं नाही. त्यामुळं मी आता आर्थिक संकटात सापडलो आहे. कृपया कोणी तरी मला मदतीचा हात द्यावा. मी आजन्म तुमचा ऋणी राहीन, अशी विनंती त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.

आर्थिक संकटात सापडल्यानं याआधीही अनेक कलाकारांनी मदत मागितली आहे आणि चाहत्यांनीही त्यांना आवर्जून मदत केली आहे.

थवासी यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कीजहक्कु चीमाईले, अन्नथा अशा अनेक सिनेमात त्यांनी काम केलं आहे.