इन्कम टॅक्स विभागानं टाटा ग्रुपच्या 6 ट्रस्टचं ‘रजिस्ट्रेशन’च रद्द केलं, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर विभागाने टाटा ग्रुपच्या सहा ट्रस्टवर कारवाई केली असून त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द केले आहे. या ट्रस्टमध्ये जमशेदजी टाटा ट्रस्ट, आर. डी. टाटा ट्रस्ट, टाटा एजुकेशन ट्रस्ट, टाटा सोशल वेलफेअर ट्रस्ट, सार्वजनिक सेवा ट्रस्ट, नवजबाई रतन टाटा ट्रस्ट या संस्थांचा समावेश आहे. आयकर कायद्याच्या 115 (TD) या कलमांतर्गत हि कारवाई करण्यात आली आहे.

टाटा करणार चौकशी
टाटा समूहाच्या वतीने देण्यात आलेल्या अधिकृत वक्तव्यामध्ये सांगण्यात आले आहे कि, आयकर विभागाच्या आदेशाची चौकशी करण्यात येत आहे. त्याचबरोबर काही कायदेशीर कारवाई करण्याची गरज पडल्यास पावले उचलले जातील. त्याचबरोबर अशाप्रकारची कोणतीही नोटीस आम्हाला आलेली नसून या अफवा कुठून उठतात आम्हाला माहित नाही.

अतिरिक्त कराची मागणी
आयकर विभागाने 2016 मध्ये आपल्या नियमांमध्ये काही बदल केले होते. यामार्फत जर तुमच्या ट्रस्टची नोंदणी रद्द झाली तर तुम्हाला मागील वर्षी मिळालेल्या आयकराच्या सुटीचा फायदा घेता येणार नाही. मागील वर्षीच्या उत्पन्नावर तुम्हाला योग्य तो कर भरावा लागेल.

काय आहे प्रकरण
आयकर विभागाने लागू केलेले हे आदेश 31 ऑक्टोबर 2019 पासून लागू झाले असून टाटा ट्रस्टने मात्र 2015 सालीचा त्याचे रजिस्ट्रेशन रद्द केले होते. या सर्व संस्थांकडे टाटाच्या कंपनीचे मोठ्या प्रमाणात शेअर्स आहेत. टाटा ट्रस्टने या सर्व संस्थांचे रजिस्ट्रेशन हे 2015 मध्येच रद्द केले होते. त्यानंतर आयकर विभागाने या सगळ्याचे मूल्यांकन केले होते.
Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या