‘हे’ आहेत T-20 क्रिकेट सामने पाहण्याचे ‘टॉप-5’ सर्वोत्कृष्ट रिचार्ज प्लॅन, वाचा संपूर्ण लिस्ट

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   टी-20 क्रिकेट स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या आगामी क्रिकेट स्पर्धेची लाइव्ह स्ट्रीमिंग Disney + Hotstar VIP वर असेल. अशात क्रिकेट चाहत्यांना टी-20 क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी Disney + Hotstar VIP चे सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. तथापि, तेच ग्राहक क्रिकेट स्पर्धेचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहण्यास सक्षम असतील, ज्यांनी एक वर्षाचे Disney + Hotstar VIP सब्सक्रिप्शनस घेतले असेल. मार्केटमध्ये Disney + Hotstar VIP रिचार्ज प्लॅनचे अनेक पर्याय आहेत. तथापि, आपल्या सोयीसाठी काही Disney + Hotstar VIP च्या सर्वोत्कृष्ट रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊया.

399 रुपयांचा प्लॅन

टी-20 क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी ग्राहक थेट Hotstar च्या वेबसाइटवरून 399 रुपयांचा Disney + Hotstar VIP चा बेसिक वार्षिक प्लॅन घेऊ शकतात. तसेच या वेबसाइटवर इतर दोन प्लॅन आहेत, ते म्हणजे 299 रुपयांचा मासिक प्लॅन आणि 1499 रुपयांचा वार्षिक प्लॅन. पण क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी 399 रुपयांचा प्लॅन सर्वोत्कृष्ट असेल. या प्लॅनवर Disney+Hotstar मल्टिप्लेक्सवर नवीनतम चित्रपट आणि विविध शोज चा देखील आनंद घेता येईल.

401 रुपयांचा जिओचा प्लॅन

टेलिकॉम प्रोव्हायडर जिओ कडून 401 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर Disney+Hotstar VIP चे वार्षिक सब्सक्रिप्शन ऑफर केले जात आहे. या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा, अमर्यादित कॉलिंगसह 28 दिवसांची वैधता मिळेल.

598 रुपयांचा जिओचा प्लॅन

जिओकडून क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी आणखी एक परवडणारा प्लॅन देण्यात येत आहे. हा प्लॅन 598 रुपयांचा आहे. या प्लॅनवर Disney+ Hotstar VIP चे वार्षिक सब्सक्रिप्शन दिले जात आहे. या योजनेत दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंगसह 56 दिवसांची वैधता उपलब्ध आहे.

448 रुपयांचा एअरटेलचा प्लॅन

आगामी टी -20 क्रिकेट स्पर्धेसाठी टेलिकॉम प्रोव्हायडर एअरटेलने एक विशेष प्लॅन देखील आणला आहे. या प्लॅनची प्रारंभिक किंमत 448 रुपये आहे. यावर Disney+ Hotstar VIP चे एका वर्षाचे सब्सक्रिप्शन दिले जात आहे. हा प्लॅन 3GB डेली डाटा लिमिट बरोबरच अमर्यादित कॉलिंग सुविधेसह येतो. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे.

599 रुपयांचा एअरटेलचा प्लॅन

Disney+Hotstar VIP चे वार्षिक सब्सक्रिप्शन एअरटेलकडून 599 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर देखील देण्यात येत आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 2GB डेटासहित अमर्यादित कॉलिंगची ऑफर दिली जात आहे. या प्लॅनची वैधता 56 दिवसांची आहे.