TRAI नं Vodafone-Idea आणि Airtel च्या प्रीमियम प्लॅन्सवर उपस्थित केले प्रश्न, घेतला रद्द करण्याचा निर्णय

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   टेलिकॉम रेग्युलेटरने (TRAI ) दूरसंचार कंपन्या भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांना प्रीमियम पोस्टपेड योजना बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. दोन्ही कंपन्या त्यांच्या प्रिमियम पोस्टपेड वापरकर्त्यांना अनुक्रमे एअरटेल प्लॅटिनम आणि रेडएक्स पोस्टपेड योजनांच्या माध्यमातून इतर वापरकर्त्यांपेक्षा चांगली सुविधा प्रदान करतात. या कंपन्यांनी या पोस्टपेड योजनांमध्ये इतर वापरकर्त्यांपेक्षा चांगली इंटरनेट गती देण्याचे वचन दिले आहे. ज्यामुळे या वापरकर्त्यांना इतर वापरकर्त्यांपेक्षा प्राधान्य दिले जाते.

पीटीआयच्या अहवालानुसार ट्रायआयने दोन्ही टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्सना ही विशिष्ट योजना तातडीने प्रभावीपणे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रायने दोन्ही ऑपरेटरला पत्र लिहून या प्रीमियम पोस्टपेड योजनेबाबत प्रश्न विचारला आहे. नियामकाने त्यांच्या पत्राद्वारे दोन्ही कंपन्यांना सांगितले आहे की, जर एखादा ग्राहक जास्त पैसे देत असेल तर त्यांना मूलभूत सेवांना प्राधान्य का दिले जात आहे? वास्तविक, बर्‍याच काळापासून, असे प्रश्न उपस्थित केले जात होते की इतर ग्राहकांच्या सेवेत घसरण करून एक प्रायॉरीटी नेटवर्क तयार केले गेले आहे. नियामकांनी हा देखील प्रश्न विचारला आहे की, त्या विशिष्ट योजनांमध्ये जास्त देय देणाऱ्या ग्राहकांना असलेले प्राधान्य इतर ग्राहकांना कमी पडणार्‍या सेवेच्या किंमतीवर आले आहे का?ट्रायने दोन्ही ऑपरेटरना विचारले आहे की ते इतर सामान्य ग्राहकांच्या हिताचे रक्षण कसे करतात.

ट्रायच्या या आदेशानंतर एअरटेलच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आमच्या सर्व ग्राहकांना उत्तम नेटवर्क आणि सेवा उपलब्ध करून देण्यास आम्ही उत्साहाने काम करत.” एअरटेलच्या प्रवक्त्याने पुढे म्हटले आहे की, त्याचबरोबर कंपनी पोस्टपेड ग्राहकांसाठी सेवा आणि जबाबदारी वाढवू इच्छित आहे. याचे उत्तर देण्यासाठी ट्रायने एअरटेलला 7 दिवसांचा कालावधी दिला आहे.

दरम्यान, एअरटेलने नुकतीच जाहीर केले होती की, जे पोस्टपेड वापरकर्ते दरमहा 499 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पैसे देतात त्यांना 4 जी नेटवर्कवर प्राधान्य दिले जाईल. या वापरकर्त्यांना इतर वापरकर्त्यांपेक्षा चांगला इंटरनेट वेग प्रदान केला जाईल. व्होडाफोन-आयडियाने त्याचप्रमाणे आपली रेडएक्स पोस्टपेड योजना सुरू केली आहे, ज्यात ग्राहकांना इतर ग्राहकांच्या तुलनेत 50 टक्के अधिक वेगाने डेटा देण्याचे आश्वासन दिले आहे. व्होडाफोन-आयडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “व्होडाफोन रेडएक्स योजनेत आमच्या अमूल्य पोस्टपेड ग्राहकांना अमर्यादित डेटा, कॉल, प्रीमियम सेवा, आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक यासह इतर अनेक फायदे उपलब्ध करून देते.” ते म्हणाले की, कंपनी आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम आणि हाय स्पीड 4 जी डेटा सेवा प्रदान करण्यास वचनबद्ध आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like