10 अंकीच राहतील मोबाइल नंबर, TRAI नं 11 डिजिट्स साठी केली नाही ‘शिफारस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिकॉम रेग्युलेटर (ट्राय) ने 11 अंकी मोबाइल नंबरसाठी शिफारस केली नसल्याचे म्हटले आहे. प्राधिकरणाने म्हटले की, त्यांनी कधीही 11 अंकी आकड्यांसाठी शिफारस केलेली नाही. तर, लँडलाईनवरून मोबाइल नंबरवर कॉल करण्यासाठी ’0’ लावण्यासाठी शिफारस केली आहे. फिक्स्ड लाईनवरून मोबाइल नंबरवर कॉल करण्यापूर्वी ’0’ लावल्याने 2,544 मिलियन अतिरिक्त नंबर्स रिसोर्स जेनरेट करता येतील. या रिसोर्सेसच्या माध्यमातून भविष्याच्या गरजचा पूर्ण करता येतील.

ट्रायच्या शिफारसीनुसार, देशभरात 10 अंकाच्या मोबाईलची व्यवस्था पहिल्याप्रमाणेच जारी राहिल. मागच्या दोन दिवसांपासून 11 अंकी मोबाइल नंबरबाबत वृत्त समोर आले होते. प्राधिकरणाने वक्तव्य जारी करून म्हटले की, देशभरात 11 अंकाच्या मोबाइल नंबरच्या व्यवस्थेसाठी कोणतीही शिफारस केलेली नाही. केवळ लँडलाइनवर कॉल करण्यासाठी नंबरच्या अगोदर ’0’ लावण्याची शिफारस केली आहे.

प्राधिकरणाने म्हटले की, फिक्स्ड लाइन आणि मोबाइल सर्व्हिससाठी युनिफाइड आणि सिंगल नंबरिंग स्कीमची सध्या गरज नाही. योग्य नंबरिंग सिस्टम रिसोर्सला विविध पद्धतीने जनरेट करता येऊ शकते. ट्रायने आपल्या शिफारसीमध्ये म्हटले आहे की, कोणत्याही प्रकारचे डायलिंग प्लॅन फिक्स्ड टू फिक्स्ड, मोबाइल टू फिक्स्ड आणि मोबाइल टू मोबाइल कॉल्समध्ये कोणत्याही प्रकारची सध्या गरज नाही. लवकरच नवीन नॅशनल नंबरिंग प्लान इश्यू केला पाहिजे आणि यासाठी त्यांनी अनयुटिलाइज्ड कॅपेसिटीला फ्री करून स्पेस क्रिएट करण्यासाठी सूचना जारी केली आहे. जेणेकरून मोबाइल सर्व्हिससाठी आवश्यक जागा तयार करता येईल.