Temperature in Maharashtra | उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात किमान तापमानात घट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Temperature in Maharashtra | मागील काही दिवसांपासून राज्यात कडाक्याची थंडी (Cold) पडली आहे. त्याचबरोबर उत्तर भारत (North India), मध्य प्रदेशातही (Madhya Pradesh) थंडीची लाट पसरली आहे. यामुळे महाराष्ट्रातही काल (गुरूवार) पासून थंडीची लाट पसरली आहे. आता महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या तापमानात (Temperature in Maharashtra) घट झाली असल्याचं समोर आलं आहे. तर, जोरदार थंड वाऱ्यामुळे थंडीचा कडाका जाणवत आहे.

भारतातील अनेक ठिकाणी तापमानात घट झाली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश या भागातील तापमानात घट झालीय. या ठिकाणी आगामी 3 दिवस थंडीची लाट पसरणार आहे. असा इशारा भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) देण्यात आला आहे. या घट तापमानाचा परिणाम महाराष्ट्रात जाणवत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक भागातल्या किमान तापमानात घट झाली आहे. तर दुसरीकडे मराठवाडा (Marathwada) व मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) काही भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत जास्त आहे. (Temperature in Maharashtra)

दरम्यान, जोरदार थंड वाऱ्यामुळे थंडीचा कडाका जाणवत आहे. त्याचबरोबर राज्यातील काही ठिकाणी किमान तापमान हे सरासरी तापमानाच्या जवळपास आहे. अशा तापमानाची स्थिती आगामी दोन दिवस असण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने (Indian Meteorological Department) सांगितलं आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान मालेगाव येथे 11.4 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे. (Temperature in Maharashtra)

प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) –