Video : नोवाक जोकोविचचा ‘कोरोना’ अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ‘बॅड बॉय’ नं शेअर केला एक धक्कादायक व्हिडिओ

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगातील पहिल्या क्रमांकाचा टेनिसपटू नोव्होक जोकोविच कोरोनाच्या कचाट्यात सापडला आहे. इतकेच नाही तर त्याची पत्नी आणि तीन टेनिसपटूही संक्रमित झाले आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे नोवाक जोकोविचतर्फे सर्बिया आणि क्रोएशिया दरम्यान आयोजित चॅरिटी स्पर्धा. काही आठवड्यांपूर्वी अशा कठीण काळात स्पर्धा आयोजित केल्याबद्दलही जोकोविचवर कडक टीका झाली होती, कारण बहुतेक खेळांचे कार्यक्रम स्थगित किंवा पुढे ढकलण्यात आले होते. अ‍ॅड्रिया टूर नावाने झालेल्या या स्पर्धेत खेळाडू आणि चाहत्यांनी देखील सामाजिक अंतराची ऐशीतैशी केली

जिथे कोणताही खेळाडू मास्क घातलेला दिसून आला नाही. खेळाडू बास्केटबॉल खेळताना आणि पार्टी करतानाही दिसले. जोकोविचच्या या स्पर्धेवर टीका करणाऱ्या सुरुवातीच्या खेळाडूंपैकी एक टेनिस जगातील बॅड बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला निक किर्गिओसने एक धक्कादायक व्हिडिओ सामायिक केला आहे, ज्यामध्ये या स्पर्धेत खेळणारे खेळाडू पार्टी करताना दिसून आले यावेळी मोठी गर्दीही पाहायला मिळत आहे. ज्यामुळे आता क्रोएशिया आणि सर्बियाची चिंता वाढली आहे. या व्हिडिओमध्ये खेळाडू पार्टी करताना दिसत असले तरी, यावेळी पार्टीचा हा व्हिडिओ धडकी भरवणाऱ्या क्षणापेक्षा कमी नाही.

व्हिडिओ सामायिक करताना किर्गिओसने लिहिले की, ते कोरोनाच्या संपर्कात येणार्‍या सर्व खेळाडूंसाठी प्रार्थना करत आहेत. तो पुढे म्हणाला कि, आपण बेजबाबदार किंवा मूर्खपणासारखे असे काहीही केले नाही. जोकोविचच्या आधी ग्रिगोर दिमित्रोव, बोर्ना कोरीच आणि विक्टर ट्रॉकी यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला.