मॅगीचं नाव ‘मॅगी’ कसं पडलं ? त्यामागे आहे 123 वर्षांचा इतिहास

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   दोन मिनिटांत तयार होणाऱ्या नूडल्स अशी ओळख असलेल्या मॅगी नूडल्सचं नाव मॅगी कसं पडलं माहिती आहे? ही 123 वर्ष जुनी कहाणी आहे. तसं भारतात 1983 मध्ये पहिल्यांदा नेस्ले इंडिया कंपनीने मॅगी नूडल्स लाँच केल्या होत्या. जगभरात त्याआधीपासूनच मॅगी नूडल्स खूप प्रसिद्ध होत्या.

सर्वांत पहिल्यांदा 1897 मध्ये जर्मनीत मॅगी नूडल्स तयार झाल्या. या नूडल्स तयार करणाऱ्या व्यक्तीचं नाव ज्युलियस मायकल जोहानस मॅगी होतं. 1886 मध्ये ज्युलियसने पटकन शिजणारा पदार्थ म्हणून नूडल्स तयार केल्या. त्यामुळे या नूडल्सचं नाव मॅगी पडलं. नंतर त्या स्वित्झर्लंड, अमेरिका आणि फ्रान्समध्ये खूप प्रसिद्ध झाल्या. ज्युलियसच्या निधनानंतर 1947 मध्ये नेस्लेनी मॅगी कंपनी विकत घेतली. (108)