टेम्पोखाली सापडल्याने एकाचा मृत्यू 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – टेम्पो चालू करुण चालक खाली उतरला, मात्र हैण्डब्रेक न लावल्याने टेम्पो पुढे गेला आणि एकाला धडकला. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास इंद्रायणीनगर येथील प्रियदर्शनी शाळेच्या जवळील मोकळ्या पार्किंगमध्ये झाला.

छबुराव कुंडलिक बिडबाग (35, रा. पिंपरी बेलदार, ता. जि. उस्मानाबाद) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सचिन सदाशिव मदने (24, रा. दत्तमंदिर, राजवाडा इंद्रायणीनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी भिवा नाना मदने (45, रा. इंद्रायणीनगर, एमआयडीसी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणीनगर सेक्टर क्रमांक दोन येथील प्रियदर्शनी शाळेच्या मोकळया जागेवर काहीजण बसले होते. त्यावेळी सचिन मदने याने टेम्पो चालू केला. टेम्पो चालू करून तो खाली उतरला. त्यावेळी त्याने हॅन्डब्रेक लावला नाही. त्यामुळे टेम्पो पुढे गेला. या टेम्पोखाली छबुराव बिडबाग सापडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

Loading...
You might also like