हवाई दलाच्या पहिल्या महिला अधिकारी डॉ. विजयलक्ष्मी रमानन यांचं निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर डॉ. विजयलक्ष्मी रमानन यांचं रविवारी रात्री निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. त्या 96 वर्षांच्या होत्या. विजयलक्ष्मी हवाई दलाच्या पहिल्या महिला अधिकारी होत्या. आपल्या मुलीच्या घरी रात्री 8.50 वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्या 2 ऑगस्ट 1955 साली वायुसेनेमध्ये अधिकारी म्हणून काम करत होत्या. 22 ऑगस्ट 1972 रोजी त्या विंग कमांडर झाल्या. 28 फेब्रुवारी 1979 रोजी सेवानिवृत्त झाल्या.

त्या काळामध्ये महिलांना हवाई दलासारख्या पुरुषांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी काम करणं सोपं नव्हतं. यासाठी खूप जास्त तयारी आणि आत्मविश्वासाची आवश्यकता असते. 1955 या सालात त्या हवाई दलाच्या अधिकारी म्हणून काम करत होत्या. सध्या नवरात्रोत्सव सुरु असून त्यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ ट्विटरवर पहायला मिळत आहे. यामध्ये त्यांनी आपला हवाई दलाचा अनुभव सांगितला आहे.

महिलांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक करीत आहोत. या दिवसात विजयलक्ष्मी यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एका मुलाखतीत त्यांनी महिलांसाठी एक संदेश दिला आहे. त्या म्हणाल्या, सुरुवातीच्या दिवसात मला हवाई दलात काम करायची भीती वाटत होती. कारण यापूर्वी मी पुरुषांसोबत काम केलं नव्हतं. मात्र त्यात शिस्त आणि कामप्रती असलेल्या प्रेमामुळे मी यश संपादन केलं. हवाई दलात देशासाठी काम करत असताना घर, संसार हा दुय्यम असतो. आधी तुमचं काम महत्त्वाचं असतं.