राज्यातील पहिल्या चारा छावणीला ६ महिने पूर्ण, पण अजून एकाही रुपयाची मदत नाही

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यातील पहिल्या चारा छावणीला आज सहा महिने पूर्ण झाले आहेत. पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथे ही छावणी सुरू आहे. अजून या छावणीला सरकारकडून एकही रूपयाची मदत मिळाली नाही.

संपुर्ण महाराट्र दुष्काळाच्या छायेत होरपळत होता त्यावेळी शरद मरकड यांनी नोव्हेंबर २०१८ पासून पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथे स्व:ताच्या खर्चांनी चारा छावणी सुरू केली. अवघ्या २० वर्षांच्या या तरूणाने ६ महिने छावणी चालवणे कौतुकास्पद चित्र आहे. हा छावणीमध्ये सध्या साधारण ५०० जनावरे दाखल आहेत.

सध्या चाऱ्याचे भाव वाढलेले आहे. छावणीला पाण्याची मोठी आडचण निर्माण झालेली आहे. रोज छावणीसाठी ४० हजार रूपयांचा खर्च येतो. गेल्या सहा महिन्यापासुन सुरू असलेल्या या शरद मरकड आता छावणी चालवणे खूप वघड झाले आहे .आता पर्यंत ह्या छावणीला मरकड यांनी ५० लाख रूपय खर्च केले. मात्र सरकार कडून अजून या छावणीसाठी कुठलीही मदत मिळालेली नाही.