एसएससी बोर्डाच्या बिल्डिंगमध्ये पेटवून घेतलेल्या ‘त्या’ तरुणीचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

एसएससी बोर्डाच्या बिल्डींगधील सार्वजनिक स्वच्छतागृहात जाळून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा आज उपचारादरम्यान सकाळी पावणे बारा वाजता मृत्यू झाला. पुनम उर्फ गुड्डी बलभीम जाधव (वय-२४ रा. कोंढवा) असं मृत तरुणीचं नाव असून ती ९० टक्के भाजली होती. प्रेमप्रकरणात आलेल्या नैराश्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

पूनम शुक्रवारी दुपारी साडे चार वाजता एसएससी बोर्डाच्या कार्यालयात आली होती. त्यानंतर तिचे संबंधित कार्यालयातील प्रियकर लिपीकाशी भांडण झाले. या कारणाने पूनमने कार्यालयातील स्वच्छतागृहात जाऊन स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. दरम्यान पूनम मोठ्या प्रमाणात भाजल्याने तिच्या किंकाळ्या कार्यालयात ऐकू आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तिला वाचवून रुग्णालयात दाखल केले होते. पूनम ही ९० टक्के भाजली होती.

शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आप्पासाहेब वाघमले यांनी दिलेल्या माहितीनुसार, “संबंधित तरुणीचे लिपिकाशी प्रेमसंबंध होते. दिड वर्षापूर्वी लिपिकाने दुसऱ्या मुलीशी विवाह केला होता. त्यानंतरही तरुणीने लिपिकाबरोबर लग्न करण्याची मागणी केली होती. मात्र त्याच्याकडुन प्रतिसाद मिळत नव्हता. शुक्रवारी दोघांमध्ये भांडणे झाली. त्यानंतर तरुणीने पेटवुन घेतले. आज तिचा मृत्यु झाला.”

नवी दिल्ली : बारा बोटं… बूट होत नाही फिट… तिला मिळाले अनोखे गिफ्ट… 

याप्रकरणी राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागविला आहे.

[amazon_link asins=’B01K2FIQD0,B07FDXCWRH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4c85baee-b8d4-11e8-8bc2-9d32cae08ae2′]