पडद्यामागे ‘कपिल शर्मा शो’ची कहाणी, अशी होते शुटींगची पूर्ण तयारी (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कॉमेडियन कपिल शर्माच्या शोचे लाखो चाहते आहेत. चाहत्यांना नेहमीच असा प्रश्न पडतो की, या शोमध्ये शुटींग नेमकी कशी होत. पडद्यामागे स्टार कसे राहतात. तुम्हालाही हा प्रश्न नक्कीच पडला असेल. याबाबत आता खुलासा झाला आहे.

अशी होते शुटींग
सोनी टीव्हीनं शुटींग कशी होते यांचं उत्तर देताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात शोची जज अर्चना पूरण सिंह आणि कपिल शर्मा फिरताना आणि गेस्टसोबत बोलताना दिसत आहेत. हा व्हिडीओ त्या एपिसोडचा आहे जेव्हा काजोल आपल्या कोस्टार शिवानी, यश्विनी आणि श्रुती हासनसोबत देवी शॉर्ट फिल्मच्या प्रमोशनला आली होती.

अर्चनानं सांगितलं आहे की, स्टेजवर एक छोटसं मंदिर आहे. तिनं चाहत्यांना हेही दाखवलं आहे की, कशा प्रकारे एक अरुंद रस्त्याचा वापर करत ती स्टेजवर जाते आणि चाहत्यांसोबत संवाद साधते आणि शोमध्ये येणाऱ्या गेस्टसोबत वेळ घालवते.

अर्चनानं सांगितलं की, “अ‍ॅक्टरला खूप धैर्य ठेवावं लागतं. त्याला कधी शॉट रेडी होण्याची, कधी सीनची, तर कधी जागेची तसेच दुसऱ्या लोकांची खूप प्रतिक्षा करावी लागते.” व्हिडीओत अर्चनानं काजोल आणि तिच्या टीमची ओळखही करून दिली आहे. स्टर्स एकमेकांसोबत बातचित करतानाही दिसत आहेत. द कपिल शर्मा शोमध्ये अर्चना पूरण सिंह आणि कपिल शर्मा यांच्याव्यतिरीक्त कृष्णा अभिषेक, कीकू शारदा, भारती सिंह, चंदन प्रभाकर आणि सुमोना चक्रबर्ती हे कलाकार काम करतात. वर्ल्ड फेमस असणारा हा शो शनिवारी आणि रविवारी टीव्हीवर सुरू असतो.