थेऊरमधील ‘कोरोना’बाधितांचा आकडा 31 वर

थेऊर : पोलिसनामा ऑनलाइन – पूर्व हवेलीतील गावाला कोरोनाचा विळखा अधीक घट्ट होत असून थेऊर येथे एकाच कुटुंबातील सहा सदस्यासह एका नामांकित कंपनीतील तीन कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली असून याचा फैलाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून भविष्यात ही कंपनी कोरोनाचा हाॅटस्पाॅट तर होणार नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे.

अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेले थेऊर येथे आजपर्यंत 31 कोरोना रुग्ण सापडले यापैकी 14 रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत तर दोन जण यात दगावले आहेत. सध्या येथे 15 रुग्णांवर वेगवेगळ्या हाॅस्पिटलमध्ये उपचार चालू असल्याची माहिती कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ मेहबूब लुकडे यांनी दिली.

काल येथील एका नामांकित कंपनीत काम करणार्या कामगारास कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला त्यावर त्याच्याशी संबंधित घरातील नातेवाईकांची चाचणी घेण्यात आली यात पाच जणांचा आज अहवाल प्राप्त झाला त्यात हे पाचही जण पाॅजिटीव आले आहेत त्यामुळे एकाच कुटुंबातील सहा सदस्य कोरोना संक्रमीत झाले आहेत.

आज डाॅ मेहबूब लुकडे यांनी संक्रमीत रुग्णाच्या उपचाराची व्यवस्था केली त्याना हाॅस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून ते रुग्ण तेथे पोहोचवले आहेत.परंतु ज्या कंपनी मध्ये हे कामगार काम करतात तेथील व्यवस्थापनाने या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतर कामगाराचा शोध घेऊन ही माहिती आरोग्य विभागाला देणे आवश्यक आहे अन्यथा लवकरच ही संक्रमणाची मोठी साखळी निर्माण होऊ शकते.डाॅ लुकडे संबंधित कंपनी व्यवस्थापनाला या विषयी पत्र देणार असल्याचे समजते