‘लॉकडाऊन’च्या अटींचं लवकरच विसर्जन ! ‘या’ निर्णयाची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  राज्यात गेल्या 5 महिन्यांपासून लॉकडाऊन लागू होता. परंतु सर्वकाही विस्कळीत न होता सुरळीत सुरू राहावं यासाठी अनलॉकची घोषणा करत काही नियम शिथील करत सुट देण्यात आली होती. आता आगामी काही दिवसात लॉकडाऊनमधून पूर्ण बाहेर पडण्यासाठी आणखी काही अटी सरकार शिथील करणार आहे.

लॉकडाऊनमध्ये बंदी असलेल्या विवाह सोहळ्यांना अनलॉकच्या काळात परवानगी मिळाली होती. परंतु यासाठी 50 लोकांना हजर राहण्याची अट होती. आता ही अट मागे घेतली जाण्याची शक्यता आहे. आता लग्न सोहळ्याला 50 हून अधिक लोकांना बोलवता येणार आहे. परंतु जितके लोक लग्नाला येणार आहे त्याच्या अंदाजानुसारच मंगल कार्यालय किंवा मोठा हॉल शोधण्याची गरज पडणार आहे.

जेव्हा याबाबत निर्णय होईल त्यानंतर सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमही सुरू होऊ शकतील. ज्या भागात कार्यक्रम घ्यायचा आहे तो भाग कंटेटमेंट झोनमध्ये असता कामा नये. केंद्राकडून सप्टेंबर महिन्यात नवीन आदेश काढला जाण्याची शक्यता आहे. याबद्दल तसा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. केंद्रीय पर्यटनमंत्री प्रल्हाद पटेल यांनी तशी माहिती दिली आहे.

दरम्यान सिनेमा आणि मालिका यांच्या शुटींगसाठी स्टुडिओ आणि बाहेर शुटींग करण्यास परवागनी देण्यात आली आहे. यात कॅमेऱ्या समोर जे कलाकार असतील त्यांना मास्क न घालण्यास परवागनी आहे. पीपीई किट, सोशल डिस्टींगच्या नियमांच पालन करून शुटींग केली जाऊ शकते.

मार्च महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन असल्यानं जिल्हांतर्गत वाहतूक ही पूर्णपणे बंद होती. वाहतूक बंद असल्यानं राज्य सरकारला मोठा आर्थिक फटका बसला होता. यानंतर केंद्रानं राज्यातील अंतर्गत वाहतुकीवरील बंदी उठवण्याचे आदेश दिले होते. यानंतर 20 ऑगस्ट पासून एसटी बससेवा सुरू झाली. परंतु खासगी वाहनांना मात्र अजूनही ई पास कायम आहे.

राज्यात सप्टेंबर महिन्यात लॉकडाऊन हटवणार ?

मुंबई महाविकास आघाडी येत्या बुधवारी बैठक घेणार आहे. लॉकडाऊनमधून लोकांची सुटका करण्यावर अधिक भर या बैठकीत दिला जाणार आहे. याशिवाय खासगी वाहनांना असणारा ई पास कायम ठेवायचा की, नाही याबद्दलदेखील या बुधवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील लोकल सेवा देखील अजूनही बंदच आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून लोकल वाहतूक सुरू आहे झाली तर मुंबई पूर्वपदावर येईल असंही बोललं जात आहे. त्यामुळं आता लोकल सेवा सुरू करायची असेल तर नेमकं काय करावं लागेल याचीही चर्चा केली जाणार आहे. सरकारला मात्र अशी भीती आहे की, लोकल सेवा सुरू केली तर कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू नये.

बुधवारी होणाऱ्या या बैठकीत लॉकडाऊन संपुष्टात आणण्यावर चर्चा होईल. परंतु याची अंमलबजावणी ही गणेश विसर्जनानंतर होण्याची शक्यता आहे.