कवी ‘रहेमान’च्या ‘अनामिका’ या पहिल्या-वहिल्या दृकश्राव्य काव्यसंग्रहाचा ‘पोस्टर’चं प्रकाशन (फोटो)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – द रायझिंग स्टार्स फिल्म प्रोडक्शन निर्मित…अनामिका हा कवी रहेमान पठाण यांचा दृकश्राव्य काव्यसंग्रह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. “तुझी ही सावली गगनात विलीन झाली असेल तेंव्हा तू या अनामिक घावाला नाव देशील…पुन्हा अनामिक !!” अलीकडच्या काळात वाचनाकडे लोकांचा कल कमी होत चालला असल्यामुळे प्रेक्षकांना कवितांचे रसग्रहण करता यावे या उद्देशाने ‘अनामिका ‘ हा दृकश्राव्य काव्यसंग्रह निर्माण केला आहे असं कवी रहेमान म्हणतो. नुकताच त्याच्या अनामिका या पहिल्या वहिल्या दृकश्राव्य काव्यसंग्रहाचा पोस्टर प्रकाशन सोहळा पार पडला. प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी, पुणे येथे पार पडला हा सोहळा झाला.

अनानिका काव्यसंग्रहाचे पोस्टर प्रकाशन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी काव्यसंग्रहाला शुभेच्छा दिल्या. आणि विद्यार्थ्यांना यशाला गवसणी घालण्यासाठी प्रेरणा दिली तसेच रहेमान हा आपल्याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि त्याच्या या प्रगतीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल परिस्थिती निर्माण करावी. आपले, महाविद्यालयाचे आणि देशाचे नाव उंच करावे, असा संदेशही त्यांनी आपल्या मनोगतातून दिला.

मराठी विभाग प्रमुख डॉ. अपर्णा पांडे यांनी काव्यसंग्रहाचे कौतुक केले आणि मराठी भाषा, साहित्य यांचं संवर्धन व्हायला पाहिजे त्यासाठी नवीन युवकांनी, साहित्यिकांनी पुढे येण्याची गरज आहे. असे आपल्या प्रस्ताविकेतून सांगितले. अगदी वेगळ्या धाटणीचे आणि जगण्याला वेगळ्या दृष्टीने प्रेम, भावना, वासना आणि विश्वास याकडे पाहायला लावण्यारा हा काव्यसंग्रह असल्याचे कवी रहेमान आणि निर्माते विनय सोनवणे यांनी नमूद केले. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करून काव्यसंग्रहाला शुभेच्छा दिल्या. काव्यसंग्रह लिहण्याचा एकूणच प्रवास कवी रहेमान यांनी मांडला.

या समारंभाला प्राचार्य डॉ. अभय खंडागळे, मराठी विभाग प्रमुख डॉ. अपर्णा पांडे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मोहन चौधरी, डॉ. संगीता लांडगे, डॉ. धनंजय वाघमारे, प्रा. सुप्रिया गावकर, निर्माते- विनय सोनवणे, कवी- रहेमान, विद्यार्थी आणि इतर प्राध्यापक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता बारावकर, पाहुण्यांची ओळख किरण यांनी केली तर स्वरूप पनस्कर यांनी आभार प्रदर्शन केले. कवी रहेमान लिखित ‘अनामिका ‘ या दृकश्राव्य काव्यसंग्रहाचे प्रदर्शन ‘ द रायझिंग स्टार्स फिल्म प्रोडक्शन’ या युट्युब चॅनेलवर लवकरच केले जाणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/