वाल्याचा वाल्मिकी झालेल्या अट्टल चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

दरोडे, खून करुन साधुच्या वेशात वावरणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर दरोडा, खून, लुटमारी अशाप्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीचा पुणे आणि अहमदनगर पोलीस १२ वर्षांपासून त्याच्या शोधात होते. या आरोपी साधुला पुणे ग्रामीण पोलिसांनी पारनेर तालुक्यातील चांभुर्डे गावातून अटक करण्यात आली आहे.
रविंद्र उर्फ रव्या अशोक काळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e56cc106-c887-11e8-a063-e577c667be9a’]

पुणे व अहमदनगर जिल्ह्यामध्ये अत्यंत क्रुरपणे लोकांची हत्या करुन लुटमारी केल्याचे गुन्हे आरोपीवर आहेत. रव्या काळे हा आपल्या टोळीतील साथिदारांच्या मदतीने लुटमारी करीत होता. तसेच दरोडे घालत होता. दरोड्यामध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. पुणे व अहमदनगर पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र, तो १२ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार होत होता. दरम्यान, रव्या काळे हा पारनेर तालुक्यातील चांभुर्डे गावात साधुच्या वेषात वावरत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती.

रव्या काळे आणि त्याच्या टोळीने २००६ मध्ये शिरुर आणि दौडमध्ये तालुक्यात दरोडा टाकला होता. या घटनेत एकाची हत्या करुन घरातील सामानाची लूट करुन फरार झाला होता. याच पद्धतीने त्याने २००९ मध्ये शिक्रापूरमध्ये दरोडा टाकला होता. या घटनेत देखील एकाचा मृत्यू झाला होता. अशा प्रकारे त्याने अनेक ठिकाणी दरोडे टाकून खून केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

[amazon_link asins=’B00FRCNR6U,B077S3Y5MQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’449e6a1b-c888-11e8-8e07-ef336d005721′]
ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने काही जिल्ह्यांमध्ये कोंम्बींग ऑप्रेशन केले होते. आरोपींकडे केलेल्या चौकशी रव्या काळे हा पारनेर तालुक्यातील चांभुर्डे गावात असल्याची माहिती मिळाळी होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री उशीरा छापा मारुन रव्या काळेला अटक केली. अटक करण्यात आली त्यावेळी रव्या काळे हा एका साधूचा वेषात दाढी वाढवलेल्या परिस्थीत सापडला.
[amazon_link asins=’B00VT8CUHS,B00PQKR85E’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5b3b2478-c888-11e8-80d0-f300fc108bc1′]
You might also like