स्टार्टअपला प्राथमिकता देत कर्ज देणार RBI, 50 कोटी रूपयांपर्यंतचं कर्ज बँकांमधून मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआयने प्राथमिक क्षेत्र कर्ज (पीएसएल)ची मर्यादा वाढवत त्यामध्ये स्टार्टअप्सचा देखील समावेश केला आहे. या अंतर्गत स्टार्टअप्सना बँकांकडून 50 कोटींपर्यंतचं कर्ज मिळवून दिलं जाईल. नव्या नियमांनुसार आता शेतकऱ्यांना सोलर आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅसच्या निर्मितीसाठी देखील कर्ज दिलं जाणार आहे.

बँकेने वाढवलं प्राथमिक क्षेत्र कर्जाची मर्यादा

आरबीआयने शुक्रवारी सांगितलं की, पीएसएलच्या व्यापक मर्यादेनंतर प्राथमिक क्षेत्रांना प्रोत्साहित करण्यासाठी हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. वंचित क्षेत्रांपर्यंत कर्ज पोहचवण्याचा प्रयत्न केला जाईल. छोटे शेतकरी तसेच समाजातील मागास वर्गातील लोकांना अधिक कर्ज देता येणार आहे. बँकेने सांगितले की प्राथमिक क्षेत्रात असणाऱ्या समानतेच्या मुद्द्यावर देखील विचार केला गेला, तसेच शेतकरी संघटना आणि शेती उत्पादन कंपन्यांसाठी अधिक कर्ज दिले जाणार आहे. अक्षय ऊर्जा आणि आरोग्य विभाग यांच्यासाठी कर्जाची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे.

फिनटेक आहे बँकिंग क्षेत्राचं भविष्य

एसबीआयचे एमडी अश्विन भाटिया शुक्रवारी बोलताना म्हणाले, फिनटेक भारतीय बँकिंग प्रणालीचं भविष्य आहे. एसबीआयचे उदाहरण देत ते म्हणाले की सध्या 91% व्यवहार डीजिटल पद्धतीने होत आहे. ही मर्यादा वाढून 100% होऊ शकते. 35 वर्षांपूर्वी असं काहीतरी होऊ शकतं याचा विचार देखील केला जाऊ शकत नव्हता. येणाऱ्या काही दिवसात युरोप आणि अन्य देशांप्रमाणे भारतात देखील बँकिंग क्षेत्रात प्रगती होईल. फिनटेकचे असे फायदे आहेत की जे बँकांकडून मिळू शकत नाहीत. यामुळे ग्राहकांना अधिक सुविधा मिळू शकणार आहेत.