‘त्या’ शिक्षिकेनं 5 वी मधील विद्यार्थ्यांसोबत केलं ‘अश्लील’ कृत्य, ‘असं’ बनवायची ‘संबंध’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेने अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महिला शिक्षिकेचे दोन ते तीन महिने हे उद्योग सुरु होते. विद्यार्थी खूप घाबरलेला असल्यामुळे त्याने याबाबत कोठेही वाच्यता केली नाही. तसेच शिक्षिकेने त्याला भीती दाखवली असल्यामुळे त्या विद्यार्थ्याने आपल्यावर होत असलेल्या घटनेबाबत कोणाला काहीच सांगितले नाही. बिहारच्या पटना मधील बिडी पब्लिक स्कुल या शाळेतील हा सर्व प्रकार आहे.

मुलाच्या आईला याची भनक लागली आणि आईने तत्काळ त्या महिला शिक्षिकेविरोधात जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. दिलेल्या तक्रारीत विद्यार्थ्यांच्या आईने असे म्हंटले आहे की 22 ऑक्टोबर रोजी विज्ञानाच्या शिक्षिकेने त्यांच्या मुलाला स्वतःच्या केबिनमधे नेले त्याचे कपडे काढले आणि त्यासोबत अश्लील कृत्य देखील केले. यामध्ये शिक्षिका त्या मुलाच्या प्रायवेट अवयवांना हात लावत असे, हा सर्व प्रकार गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरु असल्याचे देखील तक्रारीत म्हंटले आहे.

शिक्षेकेने मुलाला धमकी देखील दिली होती की याबाबत कोणाला बोलला तर तुला शाळेतून काढून टाकेन. मात्र शेवटी हा प्रकार उघड झाल्यानंतर शिक्षेकेला जाब विचारला असता शिक्षिकेने आपला गुन्हा कबुल केला असल्याचे देखील या तक्रारीत म्हंटले आहे. बिडी पब्लिक स्कुल ने याबाबत लेखी तक्रार मागून घेतली आहे आणि यावर कठोरात कठोर कारवाई करणार असल्याचे देखील सांगितले आहे.

Visit : Policenama.com