१० मतदान केंद्राची जबाबदारी सखींकडे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येकविधानसभा मतदारसंघात महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहे. शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर, श्रीगोंदा व कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्रात १० मतदान केंद्रावर महिला त्या मतदान केंद्रांचे संचलन करणार आहेत. या केंद्रावरील संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचारी सांभाळणार आहेत. विशेष म्हणजे पोलिस बंदोबस्तही महिला पोलिस कर्मचारी पाहणार आहेत. सदर मतदान केंद्रावर मतदान प्रतिनिधी म्हणून महिला कार्यकर्त्यांची नियुक्ती करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने राजकीय पक्षांना करण्यात आले आहे.

शेवगाव मतदार संघातील मतदान केंद्र क्र. १३३-जिल्‍हा परिषद शाळा भगुर, राहुरी मतदार संघातील मतदान केंद्र क्र. ५०-नूतन मराठी शाळा नंबर १ राहुरी बुद्रुक, पारनेर मतदार संघातील मतदान केंद्र क्र. १८४-पारनेर इंदिरा विकास भवन मेन हॉल, जुन्‍या तहसील ऑफीस जवळ पूर्व बाजू पारनेर, अहमदनगर मतदार संघातील मतदान केंद्र क्र. १७१-अ. ई. एस. डीएड कॉलेज सावेडी, मतदान केंद्र क्र. १७२ अ. ई. एस. डीएड कॉलेज सावेडी, मतदान केंद्र क्र. २५५ आयकॉन पब्लिक स्‍कुल चाहुराणा बु, मतदान केंद्र क्र. २५६ आयकॉन पब्लिक स्‍कुल चाहुराणा बु्. श्रीगोंदा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. २४७ श्रीगोंदा माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक विद्यालय श्रीगोंदा शहर, कर्जत जामखेड मतदार संघातील मतदान केंद्र क्र. १०६ जामखेड ल. ना. हौशिंग विद्यालय जामखेड, मतदान केंद्र क्र. १९४ जिल्‍हा परिषद शाळा, भांडेवाडी यांचा सखी मतदान केंद्रात समावेश आहे.