साखरपुडा का केला ? एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कात्रीने सपासप वार, गावकऱ्यांनी धू-धू धुतले !

नागपूर/टाकळघाट : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट या ठिकाणी एक खळबजनक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर कात्रीने सपासप वार करण्यात आले. तरुणीवर हल्ला करून पळून जात असताना नागरिकांनी हल्लेखोराला पकडून त्याची यथेच्च धुलाई करून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास टाकळघाट या ठिकाणी घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

टाकळघाट परिसरात रहात असलेली 20 वर्षीय तरुणी फार्मसीमध्ये साफसफाईचे काम करते. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ती कामावर गेली होती. काही वेळानंतर आरोपी शुभम काकडे (वय-23) हा त्या ठिकाणी आला. त्याने तरुणीशी वाद घालत दुकानातील कात्रीने तरुणीवर हल्ला करत सपासप वार केले. तरुणीने आरोडाओरडा केल्याने शेजारच्या दुकानातील फार्मसी मालकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी आरोपीच्या तावडीतून तरुणीची सुटका करू आरोपी ला पकडून त्याची धुलाई केली. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.

फार्मसीच्या मालकांनी जखमी तरुणील तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी तिच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी तिला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तरुणी एकाच वस्तीत राहतात. शुभम हा एमआयडीसीमधील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते अशी माहिती समोर आली आहे.

दोन दिवसांपूर्वी पीडित तरुणीचा साखरपुडा झाला आहे. त्यामुळे साखरपुडा का केला या रागातून तरुणाने हे कृत्य केले असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. तरुणीवर हल्ला केल्यानंतर लोकांनी आरोपी तरुणाला बेदम मारहाण केली. यामध्ये आरोपी शुभम हा गंभीर जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी शुभमवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.