‘मी देवाला सांगेन, 7 जन्म असतील तर तूच हवी’, पोलिस उपनिरीक्षकाच्या आत्महत्येनं खळबळ !

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन  –  राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) गट 10 (पुणे) मधील पोलीस उपनिरीक्षकाने स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी रात्री धानोरा तालुक्यातील सावरगाव पोलीस मदत केंद्रात घडली. चंद्रकांत शिंदे असे आत्महत्या केलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. चंद्रकांत शिंदे यांच्या खिशात चिठ्ठी सापडली असून आजारपणाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं या जवानाने चिठ्ठित लिहले आहे. या घटनेमुळे राज्य राखीव दलात एकच खळबळ उडाली आहे.

एसआरपीएफची सदर तुकडी दोन महिन्यापासून सावरगाव येथे नक्षलविरोधी अभियानासाठी कर्तव्यावर आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे अनेक दिवसांपासून मानसिक तणावात होते. चंद्रकांत शिंदे यांनी आपल्या पत्नीला उद्देशून चिठ्ठी लिहली आहे. या पत्रात त्यांनी अत्यंत भावनिक संदेश लिहला आहे. आपली पत्नी मधू शिंदे यांची माफी मागत आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. गेल्या काही वर्षापासून आजाराला कंटाळलो आहे, असे चिठ्ठीत लिहले आहे. झोप काय असते हे मला माहितीच नाही. त्यातच कमरेचा त्रास होत आहे, त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे चीठ्ठीत म्हटले आहे.

page

तसंच, तू माझ्या जिवनात आली त्यामुळे माझं आयुष्य सुकर झालं होतं. माझ्या दोन्ही मुलांना तू चांगलं सांभाळलं. तुझ्या नातेवाईकांनीही चांगली साथ दिली. तू सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे हताळल्या आहेत. त्यामुळे मला तुझ्यावर गर्व आहे. आजपर्यंत मी फक्त आनंदी राहण्याचा आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला, असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

सागर, स्नेहा, ज्योती तुम्हा सर्वांना आणि तुमच्या मम्मीला पण समोर पाहण्याची इच्छा होती. पण ती माझी इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. सागर, स्नेहा तुम्हाला मम्मीला व्यवस्थित सांभाळावे लागणार आहे. तिला कसलाही त्रास होऊ देवू नका, ती खूप हळवी आहे तिला धीर द्या, ही माझी इच्छा आहे, अशा मुलांकाकडून शेवटची इच्छाही शिंदे यांनी व्यक्त केली.