Opinion poll : दिल्लीत पुन्हा ‘आप’ची ‘सरशी’, 70 पैकी 54 जागा मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. ८ फेब्रुवारीला दिल्लीत होणाऱ्या मतदानाआधी घेण्यात आलेल्या ओपिनियन पोलनुसार राजधानी दिल्लीत आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मुख्य स्पर्धा होणार असल्याचे स्प्ष्ट दिसून आले आहे. या स्पर्धेत कॉंग्रेस पिछाडीवर असल्याचे दिसते. दरम्यान, २०१५ च्या तुलनेत मतांची टक्केवारी ३ टक्क्यांनी कमी असली तरी यंदाही आम आदमी पार्टी मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत आघाडीवर आहे. त्यामुळे या जनमत सर्वेक्षणानुसार राज्यात पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होत आहे.

२०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ५५ टक्के मते मिळवलेल्या ‘आप’ला यावेळी ५२ टक्के आणि भाजपला ३४ टक्के मते मिळतील. दिल्लीच्या ७० जागांमध्ये मागील वेळेच्या तुलनेत आम आदमी पक्षाला या वेळी ७-१३ जागा गमवाव्या लागतील. गेल्या वेळी ७० जागा जिंकणारा पक्ष या वेळी ५४- ६० जागा मिळवू शकेल, तर भाजपला १०-१४ जागा मिळतील असा अंदाज आहे. या स्पर्धेत कॉंग्रेस कोठेही दिसत नाही आणि यावेळी ०-२ जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. त्याच वेळी, ५१ टक्के लोकांचा असा विश्वास आहे की शाहीन बागेत चालू असलेल्या सीएएचा निषेध योग्य नाही तर २५ टक्के लोक ते योग्य असल्याचे मानतात.

सीट =  आप =  भाजपा = काॅंग्रेस
चांदनी चौक – १० =  ९-१० =  ० =  ०-१
पूर्वी दिल्ली – १० =  ९-१० = ० = १
नई दिल्ली – १० = ८-९ = १ = २
नार्थ-ईस्ट – १० = ५ = ५ = ०
नार्थ-वेस्ट – १० = ७-८ = २-३ = ०
दक्षिण दिल्ली – १० = ९-१० = ० = ०-१
पश्चिमी दिल्ली – १० = ७-८ = २-३ = ०

एकून – ७० = ५४-६० = १०-१४ = ०-२